घरमुंबईस्थूलतेविषयी आमीर खान करणार जनजागृती

स्थूलतेविषयी आमीर खान करणार जनजागृती

Subscribe

मुलांच्या स्थूलतेविषयी जनजागृती करणार असल्याचे अभिनेता आमीर खान यांनी सांगितले आहे. चाईल्ड ओबेसिटीवरील वेबसाईटचं उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्रासह भारतात सध्या लहान मुलांमध्ये असणाऱ्या लठ्ठपणाचं प्रमाण वाढलं आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सरकारी पातळीवर ‘चाईल्ड ओबेसिटी’ या वेबसाईटचं उद्घाटन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अभिनेता मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानने या वेबसाईटचं उद्घाटन केलं. मुलांमधील लठ्ठपणाची समस्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि ब्रीच कँडी रूग्णालयातील ओबेसिटी सर्जन (लठ्ठपणा शल्यचिकित्सक) डॉ. संजय बोरूडे यांच्या पुढाकारानं www.childobesity.in ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. एकीकडे महाराष्ट्रात कुपोषण वाढतंय तर, दुसरीकडे मुलांमध्ये लठ्ठपणा होण्याचं प्रमाण देखील वाढतंय. त्यामुळे या दोन्ही टोकांमध्ये समतोल साधायचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून यासाठी प्रयत्न केले जात आहे.

कुपोषण आणि लठ्ठपणा ही दोन टोकं

महाराष्ट्रात जास्त वजन असलेली मुलं देखील आहेत. तर, कुपोषित बालके देखील आहेत. बऱ्याचदा लहान मुलांना जर डॉक्टर किंवा न्यूट्रिशियनकडे घेऊन गेलो तर त्यांना याविषयी पूर्णपणे माहिती नसते. त्यामुळे, या वेबसाईटची सुरुवात केली गेली आहे. लठ्ठपणाबाबत सल्ला घेण्यासाठी प्रत्येकाला भेटणं शक्य होत नाही, त्यामुळे www.childobesity.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलं आहे. या संकेतस्थळामार्फत मोफत सल्ला दिला जाणार आहे.  – डॉ. संजय बोरूडे, ओबेसिटी सर्जन (लठ्ठपणा शल्यचिकित्सक)

- Advertisement -

लठ्ठपणा आणि कुपोषण हे महाराष्ट्राचं सत्य आहे. ज्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी मार्गदर्शन करणं आणि मिळणं गरजेचं आहे. या वेबसाईटद्वारे हे सोपं होणार आहे. मला स्वत:च लठ्ठपणा काय आहे हे समजायला खूप वेळ लागला. शिवाय, जे आपण खातो आपण तेच आहोत. जास्त न खाता जेवढं हवं आहे तेवढंच खाल्ल पाहिजे, जेवढ्या कॅलरीजची गरज आहे तितकंच खाऊ तरच आपण हेल्दी राहू, हे कळायलाही मला खूप वेळ लागला. लहान मुलांना हे समजावणं खूप कठीण होतं. पण, त्यांना हे सांगण गरजेचं आहे. कारण प्रत्येक व्यक्ती फॅट आणि वजन कमी करु शकतो. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या पुढाकाराला आमचा सपोर्ट आहे. – आमीर खान, अभिनेता

महाराष्ट्रात लहान मुलांचं ५ वर्षात २२ टक्के प्रमाण

लहान मुलांमधील लठ्ठपणा कमी करण्यासाठी हा चांगला उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लठ्ठपणा ही समस्या लहान मुलांमध्येही दिसून येते आहे. ही समस्या खाण्यामुळे नाही तर इतर आजार, जिन्स तसेच जीवनशैलीतील बदलामुळे जाणवते आहे. याची वेळीच गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ५ वर्षात सरासरी २२ टक्के लहान मुलांमध्ये लठ्ठपणांचं प्रमाण आहे. फक्त भारतातच नाहीतर सगळीकडेच हे प्रमाण वाढतं आहे. ग्रामीण भागातही अनेक वेगवेगळे शिबीर राबवली जातात. त्यातून जी मुलं किंवा माणसं आढळतात त्यांच्यावर उपचार किंवा शस्त्रक्रिया केली जाते. वेळीच निदान आणि उपचार झालं तर कॅन्सर, डायबिटीसचं प्रमाण ही कमी होईल. लहान मुलांमध्ये खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत, त्याचा जास्त परिणाम होतो आहे. टीव्ही, कॉम्प्युटर आणि मोबाईल यातच लहान मुलं गुंतलेली असतात. त्यामुळे हे घातक आहे.  – गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -