घरमुंबईमुंबईत ३ लाख लोकांना गंडा घालणारा भामटा गजाआड

मुंबईत ३ लाख लोकांना गंडा घालणारा भामटा गजाआड

Subscribe

मुद्दलपेक्षा दुप्पट, तिप्पट आणि चौपट रकमेने पैसे परतफेड करण्याचे सांगत गणेश हजारे नावाच्या इसमाने ३ लाख लोकांना लुबाडले आहे. पोलिसांनी या चोरट्याला सापळा रचत अटक केली आहे. गणेश हजारे सोबतच शिवाजी निफडे, सचिन गोसावी आणि मुकेश सुदेश या सहकाऱ्यांविरोधात अनेकांनी तक्रारी दाखले केल्या आहेत.

फसव्या योजनेअंतर्गत ३ लाख लोकांना गंडा घालणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी पाच वर्षांत मुद्दलपेक्षा दुप्पट पैसे, सात वर्षांत तीनपट आणि दहा वर्षांत चारपट पैसे देण्याचा खोटा दावा करत होता. पैशांच्या लोभापाई ३ लाख लोक त्याच्या या जाळ्यात अडकले. त्याने या फसव्या योजनेअंतर्गत लोकांना तब्बल ५०० कोटी रुपयांचा चुना लावला आहे. अथर्व फॉर यू इन्फ्रा अॅंड अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने केलेल्या गुंतवणूक फसवणूकीसंदर्भात काही पीडितांनी महाराष्ट्र आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली होती.

आरोपीला १३ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी

आर्थिक गुन्हे शाखेने यावर लगेच कारवाई करत गेल्या आठवड्यात एकाला अटक केली. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत या प्रकारणाचा मुख्य आरोपी गणेश हजारेला अटक केली. ठाण्याच्या तलाव पाळी परिसरात एका मीटिंगच्या निमित्ताने त्याला बोलवण्यात आले होते. तो तिथे एका खासगी कॅबमधून आला होता. तो तिथे येताच क्षणी पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर लोकलमधून त्याला पोलीस मुख्यालयात नेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गणेश हजारेचे शिक्षण फक्त १२वी झाले आहे. त्याला १३ ऑगस्ट पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

३० बॅंक अकाउंट केले सील

या भामट्यांनी लोकांना दुप्पट, तिप्पट आणि चौपट पैसे देण्याचा दावा केला होता. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कंपनीच्या एजंटने आपली कंपनी कन्स्ट्रक्शन, ट्रॅव्हल्स अॅण्ड टूरिझम, शिक्षण संस्था, हॉटेल्स इत्यादी क्षेत्रांमध्ये काम करत असल्याचे सांगत लोकांकडून पैसे उकळले. कंपनीच्या संचालकांनी दावा केला होता की, ‘त्यांना व्यापारासाठी पैसे हवे आहेत. त्यासाठी ते पैसे जमा करत आहेत’. या कंपनीच्या विरोधात जूनमध्ये पहिली पोलीस तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका कम्प्युटरमध्ये कंपनीची सर्व माहिती मिळाली. पोलिसांनी ती संपूर्ण माहिती गोळा केली.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘गणेश हजारे व्यतिरिक्त शिवाजी निफडे, सचिन गोसावी आणि मुकेश सुदेश या त्याच्या साथीदारांवरही तक्रार दाखल झाली आहे’. पोलिसांनी गणेश हजारेसह त्याच्या या तिनही साथीदारांचे एकूण ३० बॅंक अकाउंट सील केले आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी या चौघांचे दहिसरमधील वाणिज्य प्रतिष्ठान, ठाणे, दादर आणि बोरिवली कार्यालय, दहिसर, वाशी, ठाणे, शहापूर, पालघर आणि इतर ठिकाणच्या फ्लॅटवर जप्ती आणली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -