घरमुंबईनक्की किती कर्मचारी संपकाळात उपस्थितीत; आकडेवारीचा गोंधळ

नक्की किती कर्मचारी संपकाळात उपस्थितीत; आकडेवारीचा गोंधळ

Subscribe

संपकरी म्हणतायेत १०० टक्के बंद, मात्र सामान्य प्राशसन विभागाचा ९० टक्के उपस्थिती असल्याचा दावा.

राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारेल्या संपाचा आज दुसरा दिवस असून, मंत्रालयात आज संपाचा कोणताच परिणाम झाला नसल्याचा दावा सामान्य प्रशासन विभागाने केला आहे. सामान्य प्रशासन विभागाने माय महानगरला दिलेल्या आकडेवारी नुसार मंत्रालयात आज ९० टक्के उपस्थिती असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मंत्रालयातील कामकाजावर या संपाचा कोणताही परिणाम झाली नसल्याची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांकडून माय महानगरला देण्यात आली. विशेष म्हणजे कालच्यापेक्षा आज मंत्रालयात उपस्थिती जास्त असल्याचा दावा या अधिकाऱ्यांनी केला.

संपकरी म्हणतायेत १०० टक्के प्रतिसाद

दरम्यान या संपाला १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून, फक्त राजपत्रित कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी काम करत असल्याची माहिती बृहनमुंबई राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी दिली. दरम्यान संपकऱ्यांची अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत चर्चा सुरू असून, आज तोडगा निघण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

सामान्य प्रशासन विभागाकडून मिळालेली उपस्थिती पुढील प्रमाणे

विभाग                               क वर्ग                           ड वर्ग (टक्केवारीत)

- Advertisement -

मराठी भाषा विभाग –                ९२.३१                               ८८.८९
सामान्य प्रशासन विभाग –            ८९.६३                              ८१.१३
आदिवासी विभाग –                   ७९.६९                             ८३.६७
शालेय शिक्षण विभाग –               ८५.८५                             ८३.१२
वैद्यकिय विभाग –                     ९८.४१                             ९७.९८
पाणी पुरवठा –                         ८७.८०                             ९०.१६
पर्यटन आणि सांस्कृतिक               ९१.६                              ३३.३३

संपूर्ण राज्यात ५८ टक्के उपस्थिती

दरम्यान, मंत्रालय आणि मुंबईत जरी या संपाचा परिणाम दिसून आला नसला तरी ग्रामीण भागात याचा परिणाम दिसून येत आहे. संपूर्ण राज्यभरामध्ये ५८ टक्के कर्मचाऱ्यांनी कामावर हजेरी लावल्याची माहिती माय महानगरला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.

मुख्यमंत्र्याचे आश्वासन सरकारी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखीच – जयंत पाटील

लोकसभा आणि विधानसभा आता एकत्रित हे सरकार घेईल आणि त्याची तयारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी सातवा वेतन आयोगाची रक्कम देण्याची घोषणा केलेली. आधी फरक दिला पाहिजे आणि मग त्याची मुख्य रक्कम हजार कोटी आहे ती दयायची आहे. त्यामुळे जी कमिटमेंट महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिली आहे याचा अर्थ त्यांच्या तोंडाला पानेच पुसण्याचे काम हे सरकार करणार आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.
सातवा वेतन आयोग जाहीर झाल्यानंतर राज्यसरकारने अंमलबजावणी करण्यास बराच उशीर केला आहे. विधानसभेतही मी सांगितले होते की,राज्यसरकार निवडणूकीच्या तोंडावर अमूक देत असल्याचे सांगेल आणि देत असताना त्यातला काही भाग देईल आणि तशीच घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, असेही जयंत पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -