घरताज्या घडामोडीLata Mangeshkar award to PM modi: लतादीदींच्या नावाचा पुरस्कार हा देशातील सर्वसामान्यांचाच...

Lata Mangeshkar award to PM modi: लतादीदींच्या नावाचा पुरस्कार हा देशातील सर्वसामान्यांचाच – नरेंद्र मोदी

Subscribe

लतादीदी या मला मोठ्या बहिणीसारख्या होत्या. त्यांच्या नावे पुरस्कार देण्यासाठी आदिनाथ मंगेशकर यांचा फोन आला तेव्हा मी टाळू शकत नव्हतो. माझे काय वेळापत्रक आहे ते पाहिले नाही. पहिल्यांदा पुरस्कारासाठी हो म्हटले. लतादीदी या सर्वसामान्यांच्या होत्या. त्यामुळेच देशातील सर्वसामान्यांना हा पुरस्कार अर्पण करत असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले. मुंबईत पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार स्विकारताना नरेंद्र मोदी बोलत होते. मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानमार्फत हा पुरस्कार देण्यात आला.

मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानचा पहिला लता दीनानाथ पुरस्कार हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र यांना मंगेशकर कुटुंबीयांकडून देण्यात आला. प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ अशा पुरस्काराने त्यांना मंगेशकर कुटुंबीयांकडून गौरवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच मी प्रेक्षकांसोबत बसणार आहे असे स्पष्ट केले होते. जनसामान्यांच्या रूपात पुरस्कार घ्यायचा आहे, असे स्पष्ट केले होते. मंगेशकर कुटुंबीयांपैकी मीनाताई खाडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर आदी मंगेशकर कुटुंबीय हा पुरस्कार नरेंद्र मोदींना प्रदान करताना व्यासपीठावर उपस्थित होते.

- Advertisement -

आपण सौभाग्यशाली संगीताच्या सामर्थ्यांच्या शक्तीला लतादीदीच्या रूपात पाहिले आहे. आपण आपल्या डोळ्यांनी त्यांचे दर्शन करता आले आहे. मंगेशकर परिवार पिढी दर पिढी या यज्ञात आहूती देत आला आहे. माझ्यासाठी हा अनुभव अतिशय मोठा राहिला आहे. दीदीसोबत नात किती जुने आहे, दूर जाताना लक्षात आले की चार ते साडेचार दशक हे नाते आहे. माझा लतादीदींशी परिचय हा सुधीर फडके यांनी करून दिला होता. तेव्हापासून आजवर या परिवारासोबत अपार स्नेह, अगणिक घटना माझ्या जीवनाचा भाग बनली आहे. माझ्यासाठी लतादीदी सूरसम्राज्ञीसोबतच माझी मोठी बहिण होती. पिढ्यांना प्रेम, भावनांचा भेट देणारी लतादीदींचे मला मोठ्या बहिणीचे प्रेम मिळाले. यापेक्षा जीवनाचे सौभाग्य काय असेल असेही ते म्हणाले.

- Advertisement -

माझ्या जीवनात अनेक दशकांनी राखीसाठी दीदी नसेल. सामान्यपणे सन्मान घेणे मी या विषयात दूरच राहिलो आहे. पण पुरस्कार जेव्हा लतादीदींच्या मोठ्या बहिणीच्या नावे असतो अपनत्व, मंगेशकर परिवाराचा हक्क आहे, त्यामुळे माझे येणे हे दायित्व ठरते. हे त्या प्रेमाचे प्रतिक आहे. आदिनाथजी यांचा संदेश आला, तेव्हा माझे कार्यक्रम आहेत ते पाहिले तेव्हा हा म्हटल. हा पुरस्कार घ्यायला नाही म्हणणे हे मला शक्यच नव्हत. मी लता मंगेशकर पुरस्कार देशवासीयांना समर्पित करतो. लतादीदी जनसामान्यांची होती, त्यांच्या नावे दिलेला पुरस्कार सर्वसामान्यांचा आहे.

लताजी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’च्या मधुर सादरीकरणाप्रमाणे होत्या, देशातील 30 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. हिंदी, मराठी किंवा संस्कृत असो किंवा इतर भारतीय भाषा असोत, लताजींचा स्वर प्रत्येक भाषेत मिसळलेला आहे. संस्कृतीपासून ते आस्थेपर्यंत पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत लतादीदींच्या गाण्यांनी देशाला एका सूत्रात बांधण्याचे काम केले. लतादीदी या एक भारत, श्रेष्ठ भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अशा होत्या. त्यांनी ३० भाषांमध्ये हजारो गाणी गायली होती. हिंदी असो, मराठी असो, संस्कृत अनेक भाषांमध्ये लतादीदींचा स्वर हा मिसळला आहे, अशा शब्दात मोदींनी लतादीदींचे कौतुक केले.

संगीतासोबतच राष्ट्रभक्तीची चेतना ही लतादीदींमध्ये होती. चेतनेचे स्त्रोत हे त्यांचे वडिल राहिले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत शिमला येथे ब्रिटिश व्हॉईसरॉयच्या नावाने दीनानाथ यांनी वीर सावरकर यांचे गाणे गायिले होते. वीर सावरकर यांनी इंग्रजांविरोधात आव्हान देत हे गाणे लिहिले होते. ही देशभक्ती दीनानाथ यांनी आपल्या परिवाराला वारसा म्हणून सुपूर्द केली होती, असेही गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी यावेळी काढले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -