घरताज्या घडामोडीLockDown: स्थलांतरीत मजुरांसाठी पोस्टाचे स्पेशल कव्हर

LockDown: स्थलांतरीत मजुरांसाठी पोस्टाचे स्पेशल कव्हर

Subscribe

संपूर्ण जगभरात सध्या कोरोना विरोधातील लढाई सुरू आहे. भारतात सर्वाधिक फटका बसलेले शहर मुंबई शहर आहे. देशभरात सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. अनेक मजदूर देशभरात या लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. मदत नसल्यामुळे अनेक मजुरांना वेगवेगळ्या राज्यात हाल सहन करावे लागले आहेत. त्यामुळेच अनेक आव्हानांना तोंड देत हे मजूर देशातील कानाकोपऱ्यात पायी प्रवास करत आहेत. भारतीय डाक विभागाने या मजुरांच्या योगदानाला सलाम करत एक स्पेशल पोस्टल कव्हर प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल यासारख्या भागातल्या दुर्गम भागात हे मजुर परतीच्या प्रवासासाठी लागले आहेत. मुंबईसारख्या शहरात मुंबईकरांचे आयुष्यमान सुकर करण्यासाठी आणि विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे कामगार अहोरात्र मेहनत घेत शहरासाठी योगदान देत असतात. त्यामध्ये अगदी टॅक्सी ड्रायव्हरपासून ते बांधकाम मजुर, बॉलिवुडच्या सेट्सवर लागणारी तांत्रिक मदत ते झवेरी बाजारातील ज्वेलरी डिझाईन यासारख्या अनेक पातळीवर या मजुरांचे श्रमदान आणि योगदान आहे. या मजुरांच्या योगदानाचे कौतुक करण्यासाठीच भारतीय डाक विभागाने हे स्पेशल कव्हर अनावरण करण्याचे ठरविले आहे. येत्या बुधवारी म्हणजे १३ मे रोजी या स्पेशल कव्हरचे अनावरण करण्यात येणार आहे. मुंबई जीपीओच्या कार्यालयातील हॉलमध्ये हे प्रकाशन करण्यात येईल. या स्पेशल कव्हरचे अनावरण करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर हरीश अग्रवाल उपस्थित राहणार आहेत. त्यासोबतच मुंबई विभागाच्या स्वाती पांडे यांचीही उपस्थिती असणार आहे. तसेच पाच वेगवेगळ्या क्षेत्रातील स्थलांतरीत मजुरांच्या उपस्थितीत या स्पेशल कव्हर अनावरण करण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -