घरमुंबईप्रवीण छेडा आणि डॉ. भारती पवार स्वगृही परतले

प्रवीण छेडा आणि डॉ. भारती पवार स्वगृही परतले

Subscribe

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रविण छेडा आणि भारती पवार यांनी भाजपात प्रवेश केला. दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.

काँग्रेस नेते प्रवीण छेडा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. भारती पवार स्वगृही परतले. प्रविण छेडा यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपचे कमळ हातात घेतले आहे. त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला उपाध्यक्षा डॉ. भारती पाटील यांनी देखील राष्ट्रवादीचे घड्याळ सोडत भाजपचे कमळ हातात घेतले. दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रविण छेडा आणि भारती पवार यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी आशिष शेलार, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रकाश मेहता उपस्थित होते.

काँग्रेसमध्ये होत होती घुसमट

सुजय विखे पाटील, रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ आता प्रवीण छेडा आणि डॉ. भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये सतत होणाऱ्या घुसमटीमुळे प्रवीण छेडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, ‘सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. वनवास हा १४ वर्षाचा असतो पण सात वर्षात मला मुख्यमंत्र्यांनी पक्षात आणले असल्याचे प्रवीण छेडा यांनी सांगितले. ‘मुंबईतली नॉर्थ मुंबईची मला जागा काँग्रेस देत होते ती सोडून आज मी भाजपामध्ये आलो. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल’, असे प्रवीण छेडा यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

मी प्रेरित होऊन भाजपात आले

रणजीतसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपत प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला होता. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्षा भारती पवार यांनी भाजपात प्रवेश केला. दरम्यान, ‘आज भाजपामध्ये प्रवेश करताना आणि या विकास यात्रेत प्रवेश करताना मला खूप आनंद होत असल्याचे मत भारती पवार यांनी व्यक्त केले. ‘गेल्या पाच वर्षांपासून मोदींच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामे सुरू आहेत. राज्यात देखील मुख्यमंत्री विविध विकास कामे पूर्ण होत आहेत. त्यामुळेच मी प्रेरित होऊन भाजपामध्ये प्रवेश केला’, असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वगृही परतल्याचा खूप आनंद

डॉ. भारती पवार या भाजपात प्रवेश करत आहेत ही आनंदाची बाब आहे. भारती ताईंनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये ज्या स्वरूपात काम चाललेले आहे ते सर्वांना माहिती आहे. भारती ताईंच्या येण्याने दिंडोरी मतदारसंघ मजबूत झाला, असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. दरम्यान, प्रवीण छेडा हे आमचे होते फक्त काही कारणाने ते दूर झाले होते. पण, आज ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. प्रवीण छेडा यांच्या रूपाने एक चांगला नेता पुन्हा भाजपा मिळाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -