घरदेश-विदेशजपानमध्ये महिलांनी सुरु केली #KuToo मोहीम

जपानमध्ये महिलांनी सुरु केली #KuToo मोहीम

Subscribe

#metoo मोहीम सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता जपानमध्ये #kutoo मोहीम सुरु करण्यात आली आहे. जपानमधील महिलांनी ही नवी मोहीम सुरु केली आहे. ही नवीन मोहीम सोशल मीडियावर पसरत आहे.

चित्रपट सृष्टीत महिलांवर होणारे अत्याचारा विरोधात #metoo मोहीम सुरु करण्यात आली होती. या मोहीमेमुळे परदेशातील आणि देशातील अनेक कलाकारांवर आरोप लावण्यात आले होते. देशा बाहेरुन आलेल्या चळवळीमुळे सर्वे बॉलिवूड हादरून गेले होते. ट्विटरवर हा हॅशटॅग अनेक दिवस ट्रेंड करत होता. मात्र #metoo मोहीमेनंतर आता एक नवीन हॅशटॅग समोर आला आहे. हा हॅशटॅग देखील महिलांकडूनच तयार करण्यात आला आहे. माहिलांनी आपल्याला होणारा त्रासासाठी हा हॅशटॅग वापरला आहे. जपानमध्ये सध्या हा हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये आहे. या हॅशटॅगची प्रचिती आता देशाबाहेरही पसरली आहे.

काय आहे #KuToo मोहीम

प्रत्येक कपंनीला एका ऑफिशीयल ड्रेसकोड असतो. भारतामधील अनेक कंपन्यांमध्ये कामावर जाण्यासाठी फॉर्मल कपडे घालणे अनिवार्य असते. पुरुष कर्मचारी असो की महिला कर्मचारी दोघांसाठी हा ड्रेसकोड घालावा लागतो. जपानमध्ये महिलांना फॉर्मल कपडे घालण्यास सक्ती आहे. कार्यालयामध्ये ऑफिस फॉर्मल्स सोबत त्यांना हाय हिल सँडल घालणे अनिवार्य आहे. कामाच्या ठिकाणी मोठ्या सँडल घातल्यामुळे या महिलांच्या टाचा दुखू लागल्या आहेत. सँडल्सला विरोध म्हणून त्यांनी ट्विटरवर नवी मोहिम सुरु केली आहे. या मोहीमेला #Ku Too असे नाव देण्यात आले आहे. जपानी भाषेत बुटांना (कुत्सु) आणि दुखणे (कुत्सू) असे म्हणतात. याचेच मिश्रण करून जपानी महिलांनी #Ku Too मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेला अनेक महिलांचा प्रतिसाद येत आहे. कार्यालयात हाय हिल्सची सक्ती बंद करावी अशी मागणी या माहिलांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -