घरठाणेसंस्कारातूनच सहकार शक्य आहे

संस्कारातूनच सहकार शक्य आहे

Subscribe

सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन, कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांची सांगता

कुटुंब म्हणून अर्थजगत चाललं पाहिजे त्याच्याकरता संस्कार आवश्यक असून त्यातून सहकार शक्य आहे. असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कल्याणात सांगितले. कल्याण जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत कल्याण पश्चिमेतील आचार्य अत्रे रंग मंदिरात रविवारी संपन्न झाला. या प्रसंगी बँकेचे अध्यक्ष सी.ए. सचिन आंबेकर यांनी बँकेच्या गेल्या 50 वर्षातील प्रगतीचा आलेख दर्शविणारी चित्रफित सादर केली. बँकेच्या ‘सुवर्ण बंध’ या स्मरणिकेचे प्रकाशन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. मोहन भागवत यांचा परिचय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अनंत कुलकर्णी यांनी करुन दिला. तर आभारप्रदर्शन बँकेचे उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर फाटक यांनी केले. कार्यक्रमास बँकेचे आजी माजी संचालक, बँकेचे सभासद ग्राहक, मान्यवर हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात भागवत यांनी जगातले दुःख, दैना, दारिद्र्य जगातले शोषण संपेपर्यंत आर्थिक जगतातल्या कार्यकर्त्यांना कार्य करत राहावे लागणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -