घरमुंबईअखेर कळवा-मुंब्य्रातील विजवितरण खासगी कंपनीकडे

अखेर कळवा-मुंब्य्रातील विजवितरण खासगी कंपनीकडे

Subscribe

मागील अनेक वर्षांपासून कळवा-मुंब्रा आणि शीळ या परिसरातील वीज प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिसरातून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याचे कारण सांगत महावितरणने येथील वीज वितरणाचे खासगीकरण केले आहे. या परिसरातून वीज कंपनीला पुरेसे उत्पन्न होत नाही. तसेच वांरवार वीज पुरवठा खंडीत होण्यामुळेही ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. यावर कायमस्वरूपी पर्याय म्हणून अखेर येथील परिसरातील वीज वितरणाचे खासगीकरण करण्यात आले असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

विजेच्या मागणीत होत असलेली वाढ मात्र पुरवठा कमी त्यामुळे ठाणे आणि आसपासच्या शहरांतील विशेष करून कळवा-मुंब्रा परिसरातील वीजवितरणाचे नियोजन नेहमीच कोलमडत आहे. रात्री-अपरात्री वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहेत. मात्र, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार म्हणजे अघोषित भारनियमन असल्याची नागरिकांची तक्रार आहे. हे भारनियमन पूर्णत: केव्हा बंद होईल यावर महावितरण प्रशासनाकडे कोणतेही उत्तर नाही. सध्या महावितरणकडे पुरेसा वीजसाठा असला तरी वाढीव मागणीचा परिणाम हा विद्युत व्यवस्थेवर होत आहे त्यातच कळवा, मुंब्रा, दिवा या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वीज चोरीचे प्रकार घडतात. त्यामुळे वीज वितरण व्यवस्थेवर अतिरिक्त भार वाढतो. परिणामी येथील वीज पुरवठा काही काळ बंद ठेवण्यात येतो.

- Advertisement -

येथील वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरण विभागाने अनेक उपायोजना केल्या तरीही असे प्रकार वारंवार घडत आहेत. अखेर यावर पर्याय म्हणून शीळ, मुंब्रा आणि कळवा या परिसराच्या वीज वितरणाचे काम पुढील वीस वर्षाकरिता टोरेंट पॉवर कंपनीला देण्यात आले आहे. सध्या या परिसरात सुमारे 2 लाख 15 हजार वीज ग्राहक आहेत. टोरेंट पॉवर कंपनी ही या परिसरातील वीज वितरणाच्या साधनसामुग्रीचा दर्जा सुधारण्याबरोबरच वीज पुरवठ्यामध्येही सातत्य आणि दर्जा राखण्याचे काम करेल. भिवंडीमध्येही गेली अनेक वर्ष वीज वितरणाचे खासगीकरण करण्यात आले असून भिवंडीमध्येही टोरेंट पॉवर कंपनीकडेच हे काम आहे.

मुंबईमध्ये अदानीला कंत्राट देण्यात आल्यानंतर तसेच भिवंडी येथे टोरेंट कंपनीला कंत्राट दिल्यानंतर तेथील विजबिलांमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. आताच मध्यमवर्गीय वीज ग्राहकांची बिले मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. हा विषय फक्त कळवा- मुंब्रा भागासाठीचा नसून सबंध ठाणे शहरात अशाच पद्धतीने वाढीव बिले दिली जात आहेत. महावितरणला तोटा होत असल्याचे कारण सांगून जर खासगीकरण लादले जात असेल तर प्रत्येक ट्रानस्फार्मरवर नियंत्रण प्रस्थापित करावे. कुठून विजेची चोरी होते. ते त्यांनी शोधून काढावे. त्यातूनच वीज चोर हाती लागतील. अशा वीजचोरांना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. त्यासाठी आमचे सहकार्य असेल. पण, गोरगरीब वीज ग्राहकांना नाहक भूर्दंड बसवला जाणार असेल तर महावितरणच्या अधिकार्‍याना शॉक देण्याची गरज आहे,                                                            – जितेंद्र आव्हाड,आमदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -