घरमुंबईस्वातंत्र्यसैनिक प्रा. सत्यसंध बर्वे कालवश

स्वातंत्र्यसैनिक प्रा. सत्यसंध बर्वे कालवश

Subscribe

इतिहास आणि संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक प्रा. सत्यसंध बर्वे यांचे शुक्रवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. श्रीमद् भागवतची साध्या सोप्या मराठीत समश्लोकी केल्याबद्दल प्रा. सत्यसंध बर्वे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमयाचा पुरस्कार मिळाला होता.

स्वातंत्र्य सैनिक, काँग्रेसचे नेते प्रा. सत्यसंध बर्वे यांचे शुक्रवारी सकाळी मुलुंड येथील निवासस्थानी वृद्धपकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रा. डॉ. सिद्धविनायक बर्वे आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे त्यांचे चिरंजीव होत. मुलुंड येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैसवाल, उपलोकायुक्त दत्ता पडसलगीकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, क्रिस्टल कंपनीचे अमित पवारसह मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इतिहास, संस्कृत विषयाचे अभ्यासक

प्रा. सत्यसंध बर्वे हे उल्हासनगर येथील आर.के. टी. महाविद्यालयात इतिहास विषयाचे प्राध्यापक होते. ते इतिहास आणि संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक होते. प्रा. बर्वे सरांनी श्रीमद् भागवतची साध्या सोप्या मराठीत समश्लोकी केली होती. त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमयाचा पुरस्कारही मिळाला होता. शासनाच्या गृहरक्षक दलात अनेक वर्षे प्रा. सत्यसंध बर्वे अधिकारी पदावर होते. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रा. बर्वे यांनी सहभाग घेतला होता. १९३७ ते १९९५ पर्यंत ते काँग्रेस पक्षात पदाधिकारी होते. नाशिक आणि येवले काँग्रेसचे ते उपाध्यक्ष होते. तसेच अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सरचिटणीस पदावर होते. प्रदेश प्रतिनिधीपदावरही त्यांनी काम केले. टिळक स्मारक ट्रस्ट आणि शारदा ज्ञानपीठम तसेच पुणे महानगरपालिकेने प्रा. बर्वे यांना पुरस्कार देऊन गौरवले होते. अंबरनाथ येथील श्री गजानन महाराज सेवा मंडळातर्फे जीवन गौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -