घरमुंबईपंचनामा केला आणि सापडला गुटखा

पंचनामा केला आणि सापडला गुटखा

Subscribe

उल्हासनगर शहरात अपघाताचा पंचनामा करत असताना भलताच गुन्हा समोर आला आहे.

गुटख्यावर बंदी असताना देखील शहरात गुटख्याची सर्रास विक्री केली जाते. मोठ्या प्रमाणात गुटखा बाजारात विकला जातो. अशीच एक घटना उल्हासनगर येथे घडल्याचे समोर आले आहे. टेम्पोचा अपघात झाला असून या अपघात झालेल्या टेम्पोचा पंचनामा करण्यास गेलेल्या पोलीस पथकाला त्या टेम्पोमध्ये साडे सहा लाख रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटका हाती लागला आहे. पोलिसांनी यावर धडक कारवाई करून हा गुटका जप्त केला आहे.

नेमके काय घडले?

उल्हासनगर शहरात सारेआम गुटखा विक्री सुरु आहे. हा गुटखा भिवंडी येथून बंद टेम्पोतून आणला असल्याचे समोर आले आहे. गुरुवारी दुपारी पेन्सिल फॅक्टरी येथील विठ्ठल मंदिराजवळ एक टेम्पो अपघातग्रस्त झाल्याचा कॉल कंट्रोल रुम मधून विठ्ठलवाडी पोलिसांना आला. पोलीस उप निरीक्षक मंगेश जाधव, पोलीस कोन्स्टेबल सुनील रसाळ, राजेश डोंगरे, पोलीस हवालदार शितल माने, विनोद कदम हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातग्रस्त टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमधून खाकी रंगाच्या १५ गोण्या होत्या. या गोण्यांमध्ये साडेसहा लाख रुपये किंमतीचा गुटखा ताब्यात घेण्यात आला आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेचे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त धूळ टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी कौतुक केले आहे. जप्त केलेल्या गुटक्याची माहिती प्रतिबंधित अन्न व औषध प्रशासनाला पुढील कारवाईसाठी देण्यात आली असल्याचे भामे यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

वाचा – अमळनेरात ३५ लाखांचा गुटखा जप्त

वाचा – गुटखा बंदी नावापुरतीच

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -