घरमुंबईProtests From Journalists: पत्रकार वागळे, सरोदे यांच्यावरील हल्ल्याचा पत्रकार संघटनांकडून निषेध

Protests From Journalists: पत्रकार वागळे, सरोदे यांच्यावरील हल्ल्याचा पत्रकार संघटनांकडून निषेध

Subscribe

पत्रकार, संपादक आदी मीडिया प्रतिनिधींवर हल्ले झाल्यास खपवून घेतले जाणार नाहीत. प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून शासनाला हल्लाखोरांवर कडका कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असा खणखणीत इशारा पत्रकारांच्या संघटनांमार्फत सरकारला देण्यात आला.

मुंबई: ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विधिज्ञ असीम सरोदे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद मुंबईसह राज्यात उमटले आहेत. सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघासह येथील पत्रकारांच्या विविध संघटनांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निदर्शने आणि घोषणाबाजीद्वारे निषेध व्यक्त केला. (Protests From Journalists Protests from journalist organizations against the attack on journalists Wagale Sarode)

पत्रकार, संपादक आदी मीडिया प्रतिनिधींवर हल्ले झाल्यास खपवून घेतले जाणार नाहीत. प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून शासनाला हल्लाखोरांवर कडक कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असा खणखणीत इशारा पत्रकारांच्या संघटनांमार्फत सरकारला देण्यात आला.

- Advertisement -

मुंबई मराठी पत्रकार संघातील पत्रकार भवन येथे सोमवारी सायंकाळी मुंबईतील विविध पत्रकार संघटना एकत्र आल्या होत्या. पुण्यामध्ये एका कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि त्यांचे सहकारी यांच्या वाहनावर समाजकंटक, जमावाकडून भ्याड हल्ला करण्यात आला होता. त्याचे तीव्र पडसाद मुंबईसह राज्यात आणि देशातही उमटले.

हेही वाचा : ED Raid Teckchandani : बिल्डर टेकचंदानीच्या घरावर ईडीची छापेमारी; कोट्यवधीची रोकड जप्त

- Advertisement -

या घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबईमधील मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ, बृहन्मुंबई महानगरपालिका वार्ताहर संघ, प्रेस क्लब, टिव्ही पत्रकार संघटना, क्राइम रिपोर्टर असोसिएशन, फोटोग्राफर संघटना आदींसह काही कामगार संघटना, मुंबई काँग्रेसचे नेते पदाधिकारी विविध संघटना एकवटल्या होत्या.
याप्रसंगी, प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबीर सिंग, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, प्रकाश अकोलकर, राही भिडे, युवराज मोहिते आदी ज्येष्ठ पत्रकार, पत्रकार, फोटोग्राफर, मीडिया प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड व काँग्रेसचे नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि काही कामगार संघटनांनी पत्रकारांच्या या आंदोलनाला पाठिंबा देत निदर्शनात सहभाग घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -