घरमुंबईCorona: एमएमआरडीए मैदानात १ हजार बेड्सची क्वारंटाईन सुविधा

Corona: एमएमआरडीए मैदानात १ हजार बेड्सची क्वारंटाईन सुविधा

Subscribe

चीनमध्ये अशाप्रकारे तात्पुरते तंबू बांधून रुग्ण सेवा पुरवली गेली असून त्याच धर्तीवर मुंबईतील ही सुविधा उभारण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेने वांद्रे कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानाचा वापर आता कोरोनाच्या उपचारासाठी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. या मैदानाची महाकाय क्षमता पाहता याठिकाणी १ हजार बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे ही सुविधा महापालिकेसाठी उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे नजीकच्या धारावी परिसरासाठीही मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

मोक्याच्या ठिकाण बेड्सची सुविधा

पूर्व आणि पश्चिम उपनगरात मध्यवर्ती ठिकाणी असे एमएमआरडीएचे मैदान आहे. तसेच ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेची कनेक्टिव्हिटी पाहता या एमएमआरडीए मैदानाची कनेक्टिव्हिटी रूग्णांची ने आण करण्यासाठी सोयीची अशी आहे. त्यामुळेच एमएमआरडीए मैदानाची निवड महापालिकेमार्फत करण्यात आली आहे. हॉस्पिटल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातूनही हे ठिकाण अतिशय मोक्याचे असे आहे. मुंबई महापालिकेने शहरातील कटेन्टमेंट झोन पाहता आणि लोकसंख्येची घनता पाहता ज्याठिकाणी मोठ्या क्षमतेची बेड्सची व्यवस्था करता येईल अशा ठिकाणांची निवड केली आहे. त्यामध्ये गोरेगाव नेस्को, वरळीतील एनएससीआय यासारख्या ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणीसुद्धा एक हजारांहून अधिक बेड्सची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात आली आहे.

- Advertisement -

तात्पुरत्या रूग्णायलायासाठी जागेचा वापर

एमएमआरडीए मैदानात मोठ्या राजकीय सभांपासून ते मोठ्या प्रदर्शनांसाठी ही जागा वापरण्यात येते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात याठिकाणी मेक इन इंडियाचे मोठे प्रदर्शन भरविण्यात आले होते. पण आता या जागेचा वापर हा तात्पुरत्या रूग्णायलायासाठी होणार आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या सेवा सुविधा तसेच रुग्ण खाटांसह डॉक्टर आणि नर्सेस, तसेच वॉर्डबॉय आदींची व्यवस्था करण्यात आली. चीनमध्ये अशाप्रकारे तात्पुरते तंबू बांधून रुग्ण सेवा पुरवली गेली असून त्याच धर्तीवर मुंबईतील ही सुविधा उभारण्यात येत आहे. रूग्णांच्या आयसोलेशन सुविधेसाठी ही सुविधा उभारण्यात येत आहे. १ हजार खाटांची, प्राणवायूच्या सुविधेसह पर्यायी यंत्रणा उभी केली जात आहे. येथील प्रत्येक खाटांना प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची यंत्रणा आहे.


Corona Live Update : २४ तासांमध्ये औरंगाबादमध्ये ४२ नव्या रुग्णांची वाढ!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -