घरCORONA UPDATEलॉकडाऊनमध्ये श्रीमंताचा हॉटेलमध्ये हैदोस; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

लॉकडाऊनमध्ये श्रीमंताचा हॉटेलमध्ये हैदोस; सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Subscribe

कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात पहिल्यांदा २५ मार्च आणि त्यानंतर १४ एप्रिल रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पुर्ण देश मोठ्या अडचणीतून जात आहे. गरिबांना खायला अन्न मिळत नाही, तर देशातील अनेक राज्यात परराज्यातील मजूर अडकून पडले आहेत. मात्र श्रीमंतांना याचा कुठलाही फरक पडलेला नाही. कारण स्टिल सीटी म्हणून नावाजलेल्या जमशेदपूरमध्ये एका स्पा पार्लरमधील सेक्स रॅकेट उघड झाले आहे. कोलकातामधील महिला एक महिन्यापासून हे सेक्स रॅकेट चालवत होती.

जमशेदपूरमधील एका थ्री स्टार हॉटेलमध्ये असलेल्या स्पामध्ये हे सेक्स रॅकेट चालत होते. पोलिसांनी रविवारी छापा मारून या रॅकेटचा पर्दाफाश केला. तेव्हा अनेक श्रीमंत नागरिक स्पामध्ये रंगेहात सापडले. देशात लॉकडाऊनसारखी गंभीर परिस्थिती असतानाही जमशेदपूरच्या धनिकांना त्याचे कोणतेच सोयरसूतक नसल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

पोलिसांच्या छापेमारी नंतर हॉटेल मालक आणि मॅनेजरसहीत स्पा चालविणाऱ्या महिलेला अटक केली आहे. तिघांचीही रवानगी सध्या तुरुंगात करण्यात आली आहे. हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जमशेदपूरच्या बिस्टुपुर पोलीस स्टेशनमधील पोलीस अंमलदाराला निलंबित केले आहे. तर इतर चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.

रविवारी पोलिसांना एका थ्री स्टार हॉटेलमध्ये बॉडी मसाजची सेवा मिळत असल्याची माहिती मिळाली. फक्त अत्यावश्यक सेवांना परवानगी असताना मसाज पार्लर चालू कसे? याचा तपास करण्यासाठी जिल्हा पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये पोहोचले होते. छापा मारल्यानंतर शहरातील तीन नामांकित व्यक्ती नको त्या अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी तात्काळ हॉटेलला सील केले असून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. त्यामध्ये रॅकेट चालवणारी महिला एका महिन्यापासून ये-जा करत असल्याचे निदर्शनास आले. जमशेदपूरचे विशेष पोलीस अधिकारी अनूप बिरथरे यांनी सांगितले की, आम्ही जेव्हा हॉटेल मालक आणि त्या महिलेला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी सेक्स रॅकेट चालवत असल्याचे मान्य केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -