घरCORONA UPDATECorona Live Update: चिंताजनक; मुंबईमध्ये कोरोनाने आज घेतले २५ बळी

Corona Live Update: चिंताजनक; मुंबईमध्ये कोरोनाने आज घेतले २५ बळी

Subscribe

कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना मंगळवारी मुंबईमध्ये तब्बल २५ जणांचा कोरोनाने बळी घेतला. आतापर्यंत प्रथमच मुंबईत इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे बळी गेले आहेत. बुधवारी ३९३ कोरोनाबाधित सापडले असून २१९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.


ठाणे महापालिका हद्दीत मंगळवारी नवीन १५ रूग्ण आढळून आले त्यामुळे करोनाबाधित रूग्णांची संख्या २५६ झाली आहे. मुंब्रा प्रभाग समितीत सर्वाधिक ४७ रूग्ण असून त्या खालोखाल लोकमान्य सावरकर प्रभाग समितीत ४२ रूगण, नौपााडा कोपरी प्रभाग समिती ३३ रूग्ण, वागळे प्रभाग समिती ३१ रूग्ण, उथळसर प्रभाग समिती २८ रूग्ण, कळवा प्रभाग समिती २७ रूग्ण, वर्तकनगर प्रभाग समिती २३ रूग्ण, तर माजीवडा प्रभाग समिती १९ तर सर्वाधिक कमी ६ रूग्ण हे दिवा प्रभाग समितीत आहेत. करोनाबाधित रूग्णाांची संख्याची झपाटयाने वाढ होत असल्याने लोकमान्य सावरकरनगर आणि नौपाडा कोपरी हे परिसर पूर्णत: सील करण्यात आले आहेत.

- Advertisement -

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या वांद्रे उपनगर स्थानकात १४ एप्रिल रोजी अचानक हजारो मजूरांनी घरी जायचे असल्याचे सांगत गर्दी केली होती. विशेष ट्रेनची त्यांच्याकडून मागणी करण्यात आली होती. या गर्दीप्रकरणी विनय दुबे या सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज वांद्रे कोर्टाने त्याला १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

- Advertisement -

 


राज्यासह भिवंडीतही कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून मंगळवारी शहरातील निझामपुरा येथील आणखी एका ५८ वर्षीय इसमाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती समोर आली आहे. हा रुग्ण वेतळपाडा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णासोबत मालेगाव येथून आला होता, त्यास कॉरंटाइन करण्यात आले होते. मंगळवारी त्याचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ तर ग्रामीण भागात १० असे भिवंडीत कोरोना रुग्णांची एकूण संख्या २२ वर पोहचली आहे.

 


मुंबई पोलीस आयुक्तांनी पोलिसांच्या ड्युटीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या ३ दिवसांमध्ये ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ५५ पेक्षा जास्त वयाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना ड्युटीसाठी रस्त्यावर न येण्याची मुभा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, त्यांची इच्छा असेल, तर ते ड्युटीवर येऊ शकतात, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.


गेल्या २४ तासांमध्ये औरंगाबादमध्ये ४२ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये ९ वर्षांखालील ७ मुलांचा समावेश आहे. या रुग्णसंख्येनंतर औरंगाबादमध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ९५वर पोहोचला आहे. म्हणजेच याआधीचे ५२ रुग्ण हे गेल्या महिन्याभरात सापडले होते आणि गेल्या २४ तासांतच इथे ४२ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यातले १२ रुग्ण एकाच ठिकाणी सापडले आहेत. त्यामुळे औंरंगाबाद कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनू लागलंय का? अशी चिंता तिथल्या स्थानिक प्रशासनाला सतावू लागली आहे.


नाशिकच्या मालेगावमध्ये ३६ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढ. यातल्या ४ रुग्णांचे रिपोर्ट डिस्चार्ज देताना केलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह झाले. यामध्ये एका ९ महिन्यांच्या बाळाचा देखील समावेश आहे. त्यामुळे नाशिकमधल्या एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची सख्या १८६वर गेली आहे.


गेल्या २४ तासांत भारतात कोरोनामुळे ६४ जणांचे मृत्यू झाले असून १ हजार ५४३ नवे रुग्ण सापडले आहेत.


दिल्लीमध्ये लॉकडाऊन असूनही भाजी मंडईमधली गर्दी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. दिल्लीच्या ओखला भागामध्ये आज सकाळी देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -