घरमुंबईराहुल गांधी लवकरच महाराष्ट्रात येणार

राहुल गांधी लवकरच महाराष्ट्रात येणार

Subscribe

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरु झाली असून कार्यकर्त्यांचा मनोबल उंचविण्यासाठी लवकरच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे महाराष्ट्रात येण्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या सेवादलाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमानिमित्त राहुल गांधी हे महाराष्ट्रात येणार असून ते त्यावेळेस राज्यात प्रचाराचा नारळ वाढवितील, असे बोलले जात आहे. त्यामुळे या दौर्‍यासाठी आता काँग्रेसच्या नेत्यांनी आपली तयारी सुरु केली असल्याची माहिती पुढे आली आहे.

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुकंले आहे. यासाठी आता लवकरच काँग्रेसची पहिली यादी जाहीर करण्याची तयारी सुरु झाली असून यासाठी काँग्रेसी नेत्यांनी ही आपली तयारी सुरु केली आहे. लोकसभा पराभवानंतर कार्यकर्त्यांचे खचलेले मनोबल उंचविण्यासाठी काँग्रेसी नेत्यांची नवरणनिती आखण्यास सुरुवात केली असून त्यानुसार काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी साकडं घालण्यात आल्याची माहित पुे आली आहे. त्यानुसार राहुल गांधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या समारोपानिमित्त सेवाग्राम येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून यात राहुल गांधी देखील सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

सेवादलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पदयात्रेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाई, महाराष्ट्र सेवादलाचे प्रभारी मंगलसिंग सोळंकी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेते आणि काँग्रेस पदाधिकारी उपस्थित असणार आहे. वर्ध्यातील ही पदयात्रा सकाळी 2 ऑक्टोबरला सकाळी बापू कुटी, सेवाग्राम आश्रम परिसर येथून सुरु होईल आणि हुतात्मा स्मारक, आदर्शनगर, वर्धा येथे या यात्रेचा समारोप होईल. पदयात्रा संपल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या पदयात्रेला राहुल गांधी उपस्थित राहणार असल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -