घरमहाराष्ट्रविजेच्या धक्क्याने ५ म्हशी दगावल्या

विजेच्या धक्क्याने ५ म्हशी दगावल्या

Subscribe

बोर्ली पंचतनमधील तिसरा प्रकार

परिसरात चरण्यासाठी गेलेल्या 5 म्हशींना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत असून, दुसरीकडे या ठिकाणचा वीज प्रवाह बंद केला असल्याचे सांगितले जात असल्यामुळे वीज प्रवाह नेमका कुठून सुरू होता, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बोर्लीपंचतन मार्गावर असणार्‍या कार्ले पंचतन येथे नदी किनारी लियाकत हुसेन अरब यांच्या मालकीचा तबेला आहे. दुधाचा व्यवसाय असल्यामुळे त्यांच्याकडे 25 हून अधिक म्हशी आहेत. नेहमीप्रमाणे या म्हशी चरणासाठी बोर्ली-श्रीवर्धन मार्गावरून सकाळी 9.30 च्या सुमारास रानमाळावर जात होत्या. यातील ५ म्हशी विजेच्या खांबाजवळून गेल्या असता खांबावरील जिवंत वीजवाहक तारा तुटलेल्या असल्याने त्यांना या तारांचा स्पर्श होताच तडफडून त्या जागीच गतप्राण झाल्या.

- Advertisement -

घटना घडलेल्या ठिकाणी झाड पडल्याने वीज वाहिनीचा प्रवाह 4 दिवसांपूर्वी खंडित करण्यात आल्याचे सांगितले जाते. तसे असेल तर मग वीज प्रवाह कोठून आला, असा प्रश्न महावितरणलाच पडला असून, आता कारणांचा शोध सुरू झाला आहे. या प्रकरणाचा पंचनामा कार्ले तलाठी सजा भगत व महावितरणकडून करण्यात आला आहे. अरब यांचे यामध्ये 5 लाख 10 हजाराचे नुकसान झाले असल्याचे समजले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी वेळास येथे दिघी-बोर्ली मार्गावर देखील असाच प्रकार दोन वेळा घडून वीज वाहिनीच्या धक्क्याने 3 म्हशी मृत्यूमुखी पडल्या होत्या.

घटना घडलेल्या ठिकाणी काही दिवसांपूर्वी वाहिनीवर झाड पडल्याने वीज पुरवठा बंद ठेवला होता. परंतु हा वीज पुरवठा कसा सुरू झाला, याचा शोध घेतला जात असून, नुकसान झालेल्या लियाकत अरब यांना नुकसान भरपाई मिळेल यासाठी लवकरच तसा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल.
-महेंद्र वाकपैजण, उप कार्यकारी अभियंता, श्रीवर्धन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -