घरमुंबईआता रेल्वे स्टेशनवरच वर्कस्टेशन !

आता रेल्वे स्टेशनवरच वर्कस्टेशन !

Subscribe

विरारपासून मुंबई गाठणाऱ्या प्रवाशांची रोजची प्रवासाची लक्षात घेता आता पश्चिम रेल्वेनेच पुढाकार घेतला आहे. विरारमध्ये वर्कस्टेशन उभे करून त्याठिकाणाहून रेल्वे कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठीची मुभा देण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेकडून देण्यात आला आहे. घरामध्ये इंटरनेट कनेक्शनचे प्रॉब्लेम्स तसेच कामासाठी व्यत्यय ठरणाऱ्या अनेक बाबींवर मात करत ऑफिससारखा सेट अप याठिकाणी उपलब्झध करून देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे इंटरनेटची कनेक्टिव्हिटी आणि ऑफिससारखे काम करण्यासाठी सुसज्ज असलेले हे वर्कस्टेशन आहे.

एकट्या विरारमध्ये आतापर्यंत पाच वर्कस्टेशन उभारण्यात आले आहेत. तर आणखी काही ठिकाणी १० वर्कस्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये वांद्रे स्थानकाचाही समावेश आहे. त्यामुळे मुंबईकडे प्रवास करून कामाच्या ठिकाणी पोहचणाऱ्या कामगारांना स्टेशनच्या ठिकाणीच वर्कस्टेशनमध्ये आपल्या कामाच्या शिफ्टनुसार काम करता येणार आहे. विरार ते वांद्रे दरम्यान जसे वर्कस्टेशन तयार करण्यात आले आहेत तसेच वर्कस्टेशन हे चर्चगेट स्थानकावर तयार करण्याची तयारी रेल्वेकडून करण्यात येत आहे. सध्या कोणत्या भागात वर्कस्टेशन उभारायचे यायची चाचपणी सुरू असून येत्या दिवसांमध्ये ही यादी निश्चित होईल असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

तर मध्य रेल्वेनेही २०१७ पासूनच काही कार्यालये शिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. त्यामुळेच कल्याणच्या पुढील कामगारांना कल्याण आणि कर्जत स्थानकात काम करण्याची मुभा मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावर प्रवेशाच्या वेळी होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून फ्लॅप गेट्सची उभारणी करण्याचा रेल्वेचा विचार आहे. त्याची सुरूवात ही सीएसएमटी आणि चर्चगेट स्थानकापासून होत आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस हे फ्लॅप गेट बसवण्यात येणार आहेत. या गेट्सवर क्यूआर कोड असेल तसेच थर्मल स्कॅनरही असेल. प्रवाशांना क्यूआर कोडचा वापर करून प्रवेश मिळेल. रेल्वे स्टेशनच्या आतमध्ये जाण्यासाठी प्रथम थर्मल स्कॅनिंग करावी लागेल. त्यानंतरच स्टेशनवर प्रवेश मिळेल.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -