घरमुंबईकुर्ला भाभा हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षकाला सापाचा दंश

कुर्ला भाभा हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षकाला सापाचा दंश

Subscribe

कुर्ला येथील भाभा हॉस्पिटलमधील एका वार्डमध्ये  मंगळवारी रात्री ३ च्या सुमारास अचानक एक साप शिरला. सापाला पाहून सुरक्षा रक्षकाने वार्डमध्ये धाव घेत सापाला पकडले.

कुर्ला येथील भाभा हॉस्पिटलमधील एका वार्डमध्ये  मंगळवारी रात्री ३ च्या सुमारास अचानक एक साप शिरला. सापाला पाहून सुरक्षा रक्षकाने वार्डमध्ये धाव घेत सापाला पकडले. त्यानंतर सापाला बाटलीमध्ये भरताना सापाने सुरक्षा रक्षकाच्या हातावर दंश केला. सुरक्षा रक्षकावर तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
 
 
कुर्ला भाभा हॉस्पिटलच्या बाजूला रेल्वेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे आहेत. त्यामुळे तेथून साप हॉस्पिटलमध्ये येण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. मंगळवारी रात्री घोणस जातीचा साप अचानक एका वॉर्डमध्ये शिरला. साप पाहून वॉर्डमधील परिचारिका आणि कर्मचारी यांची धावपळ सुरु झाली. वॉर्डमध्ये साप शिरल्याचे कळताच ड्युटीवर असलेले सुरक्षा रक्षक सुभाष पार्टे  यांनी धाव घेतली आणि सापाला पकडले. त्यानंतर सापाला बाटलीमध्ये भरत असताना त्याने सुरक्षारक्षकाच्या हाताला दंश केला. मात्र तरीही सुरक्षा रक्षकाने त्याला बाटलीमध्ये भरून बाहेर सोडला. सापाने दंश केल्याने सुरक्षा रक्षकाला तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुन्हा भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर आता भाभा हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत. सुरक्षा रक्षकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका सईदा खान यांनी दिली. 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -