घरमुंबईशर्मिला ठाकरेंचा चावा घेतलेल्या राज यांच्या कुत्र्याचे निधन

शर्मिला ठाकरेंचा चावा घेतलेल्या राज यांच्या कुत्र्याचे निधन

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बॉंड या कुत्र्याचे आज निधन झाले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे प्राणी प्रेम सर्वांना माहित आहेच. राज ठाकरे राजकारणात असले तरी पाळीव प्राण्यांसोबतही ते वेळ घालवत असतात. मात्र त्यांच्या लाडक्या कुत्र्याचे आज दुःखद निधन झाले आहे. दुपारी दोनच्या सुमारास बॉंड असे नाव असलेल्या कुत्र्याचे निधन झाले असून त्याच्यावर परळच्या प्राणी रुग्णालया (हाफकीन) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी शर्मिला ठाकरेंचा चावा घेणारा हाच तो कुत्रा. राज ठाकरे यांनी स्वत: परळच्या स्मशानभूमीत बॉंडला अखेरचा निरोप दिला.

बॉंड विषयी थोडक्यात

बॉंड हा राज ठाकरे यांच्या कर्जतच्या फार्महाऊसवर राहत होता. बॉंडनेच मागे एकदा राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्या गालाचा चावा घेतला होता. त्यामुळे बाँडची रवानगी कर्जतच्या फार्महाऊसवर केली होती. मागच्या साडेबारा वर्षांपासून बॉंड राज ठाकरे यांच्यासोबत होता. त्याच बॉंडचे आज निधन झाले. शर्मिला ठाकरे चावा घेतल्यानंतर सर्वच कुत्र्यांची रवानगी कर्जतच्या फार्म हाऊसवर करण्यात आली होती.

- Advertisement -

राज ठाकरेंनी ग्रेट डेन जातीचे दोन कुत्रे पाळले असून जेम्स आणि बॉंड ही त्यांची दुसरी पिढी आहे. तर ज्युनिअर जेम्स बॉंडबरोबरच राज ठाकरेंच्या कुटुंबात आणखी एक ग्रेट डेन कुत्र्याचा समावेश झाला आहे. त्याचे शॉन असे नामकरणही करण्यात आले आहे. या तीन कुत्र्यांसोबत कृष्णकुंजवर आणखी तीन पग जातीचे कुत्रे होते. तसेच सिम्बा – बॅम्बी आणि बोल्ट या श्वान कुटुंबात आणखी सदस्य आहेत. राज ठाकरेंच्या कुटुंबात ९ ते १० कुत्रे असून या सर्व कुत्र्यांचे राज ठाकरे यांनी नामकरण केले आहे. राज ठाकरे यांचे श्वानप्रेम लोकांच्या परिचयाचे असल्याने कृष्णकुंज या निवासस्थानी गेल्या काही वर्षांपासून हे कुत्रे पाळण्यात आले होते. मात्र या सर्व कुत्र्यांची रवानगी कर्जतच्या फार्महाऊसवर करण्यात आली आहे.


वाचा – काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आताचं सरकार बेकार – राज ठाकरे

- Advertisement -

वाचा – माझी पोतडी निवडणुकीच्या वेळी उघडेन – राज ठाकरे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -