घरमनोरंजनमाणसाची ताकद छातीच्या इंचावरून ठरत नाही; 'ठाकरे'मध्ये मोदींना टोला

माणसाची ताकद छातीच्या इंचावरून ठरत नाही; ‘ठाकरे’मध्ये मोदींना टोला

Subscribe

'माणसाची किंमत छाती किती इंचाची आहे यावर ठरवत नसतात, ताकद मेंदूत असते'. हा डायलॉग आहे बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा 'ठाकरे' या चित्रपटातील. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली छाती ५६ इंचाची असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून आता 'ठाकरे' चित्रपटातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा टोला हाणला गेला आहे.

‘माणसाची किंमत छाती किती इंचाची आहे यावर ठरवत नसतात, ताकद मेंदूत असते’. हा डायलॉग आहे बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा ‘ठाकरे’ या चित्रपटातील. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली छाती ५६ इंचाची असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून आता ‘ठाकरे’ चित्रपटातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा टोला हाणला गेला आहे. चित्रपटामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या तोंडी ‘माणसाची किंमत छाती किती इंचाची आहे यावर ठरवत नसतात, ताकद मेंदूत असते’ हा डायलॉग ‘ठाकरे’ या चित्रपटामध्ये आहे. २३ जानेवारी रोजी मराठी आणि हिंदी भाषेमध्ये ठाकरे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये आपल्याला शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा संपूर्ण प्रवास पाहता येणार आहे. वडाळ्यातील आयमॅक्स थिएटरमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर लॉच करण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरेंसह शिवसेनेचे नेते देखील हजर होते.

नवाजुद्दीन बाळासाहेबांच्या भूमिकेत

नवाजुद्दीन सिद्दकीनं बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे. तर, अमृता राव ही मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. मराठी आणि हिंदी भाषेत ‘ठाकरे’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉच करण्यात आला. हिंदी आणि मराठीमध्ये देखील ट्रेलर लॉच झाला असून दोन्ही ठिकाणचे सीन्स आणि डायलॉग देखील वेगळे आहेत. मराठीमध्ये सचिन खेडेकर यांनी डबिंग केली आहे. २३ जानेवारी रोजी मराठी आणि हिंदी भाषेमध्ये ठाकरे चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सर्वांना आता उत्सुकता लागली आहे ती ‘ठाकरे’ चित्रपट सिनेमागृहात येतोय कधी? याची!!

वाचा – असा आहे ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -