घरताज्या घडामोडीराज ठाकरेंनी आजही साधला ९ नंबरचा टायमिंग

राज ठाकरेंनी आजही साधला ९ नंबरचा टायमिंग

Subscribe

राज ठाकरे यांनी आजही टोल नाक्याच्या विषयावर असलेल्या न्यायालयीन सुनावणीच्या निमित्ताने ९ नंबरच्या लकी नंबर साधला. नवी मुंबईत कोर्टात हजेरीसाठी निघालेले राज ठाकरे यांनी आजदेखील घरातून निघताना ९ नंबरचा आकडा गाठला. आपल्या लकी अशा ९ या क्रमांकाच्या गाडीतून ते नवी मुंबईच्या दिशेने निघाले. नवी मुंबईत २०१४ च्या टोल नुकसान प्रकरणात नवी मुंबईच्या बेलापूर कोर्टाने त्यांना वॉरंट बजावला आहे. आज शनिवारी सकाळी घरातून निघतानाही राज ठाकरे यांनीही ११.०७ वाजता घरातून बाहेर पडताना हा ९ च्या लकी नंबरचा टायमिंग साधला. घरातून निघतानाही त्यांनी (१+१+७) अशा ९ नंबरच्या लकी मुहुर्तालाच बाहेर पडले. राज ठाकरे यांचे ९ नंबरचे प्रेम याआधीही अनेकदा दिसून आले आहे. अनेकदा त्यांच्या प्रचारसभांपासून ते राजकीय सभांसाठीही त्यांच्याकडून आपला हा लकी नंबरचा ९ चा मुहुर्त साधण्यात येतो.

raj thackeray
राज ठाकरे यांनी शिवसेनेला ठोकला होता रामराम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुरूवात झाल्यानंतर राज ठाकरे यांची पहिली सभाही ९ तारखेलाच झाली होती. राज ठाकरेंनी आपल्या विधानसभेसाठीच्या उमेदवारांची यादीही याच ९ तारखेला जाहीर केली होती. राज ठाकरे ९ नंबर लकी मानतात, त्यामुळेच अनेक कामासाठी त्यांच्याकडून या आकड्याची निवड होते. राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यापासून ते मनसे पक्षाची घोषणा करण्यापर्यंत अनेक आकडे हे राज ठाकरे यांच्या ९ आकड्याशी संबंधित आहेत. राज ठाकरे यांच्याकडे असलेल्या सर्व गाड्यांची नंबर प्लेट ही ९ नंबरची आहे. शिवाय राज ठाकरे यांच्या मुलाचा लग्नाचा मुहुर्त हादेखील २७ जानेवारी म्हणजे (२+७) असा ९ हाच होता. लग्नाचा मुहुर्तही १२.५१ मिनिटांनी म्हणजे पुन्हा या आकड्यांची बेरीज असा ९ आकडा हा नंबर गाठण्यात आला होता.

- Advertisement -
RajThackeray
शिवतीर्थावरील पहिली सभा १८ मार्च २००५

कस आहे ९ नंबरच कनेक्शन ?

गाड्यांच्या नंबर प्लेटचा नंबर ९
नवी मुंबईत कोर्टात निघण्याचा टायमिंग ११.०७ (१+१+७)=९
शिवसेनेला रामराम १८ डिसेंबर २००५ (१+८) = ९
शिवतीर्थावरील पहिली सभा १८ मार्च (१+८) = ९
पहिल्या विधानसभा निवडणूक पहिली उमेदवार यादी २७ (२+७) = ९
दुसरी उमेदवारीत यादीत ४५ उमेदवारांची घोषणा (४+५) = ९

raj-thackeray-son-amit-wedding-reception
अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहुर्त
Raj Thackeray uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंवर एन्जिओग्राफी झाल्यानंतर राज ठाकरे हे आपल्या या कारमधून उद्धव ठाकरेंना ड्राईव्ह करत घरी नेले होते

 

- Advertisement -

 

 

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -