घरमुंबईतुमच्या भावनांचा मला आदर, भारत रत्नची मागणी थांबवा - रतन टाटा

तुमच्या भावनांचा मला आदर, भारत रत्नची मागणी थांबवा – रतन टाटा

Subscribe

उद्योगपती रतन टाटा यांनी नेटकऱ्यांचे ट्विट करुन आभार मानले

भारतीय उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी कोरोना काळात कोरोना योद्यांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी मोठी मदत केली. देशातील समाजकार्यात रतन टाटा यांचे मोठे योदान आहे. रतन टाटा यांना भारत रत्न द्यावा अशी मागणी सोशल मिडियाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. रतन टाटांनी कोरोना काळात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पंचतारांकीत हॉटेल राहण्यासाठी दिले होते. तसेच हजारो कर्मचाऱ्यांना रोज जेवणही पुरवले जात होते. रतन टाटा भारताच्या विकासासाठी सतत काहीतरी योगदान देत असतात. मोटिवेशनल स्पीकर डॉ. विवेक बिंद्रा यांनी रतन टाटा यांना भारत रत्न पुरस्कार देण्याची मागणी केली होती. यांनंतर आज (शुक्रवारी) ट्विटरवर रतन टाटा यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. ट्विटरवर BharatRatnaForRatanTata हा हॅशटॅग ट्रेंड झाला आहे. यानंतर रतन टाटा यांनी आपली प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांचे आभार मानले आहेत. कोरोना काळात रतन टाटा यांनी मुंबई पालिकेला १०० व्हेंटिलेटर,२० रुग्णवाहिका व दहा कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले.

सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी रतन टाटा यांना भारत रत्न द्यावा अशी मागणी केली आहे. नेटकऱ्यांच्या या मागणीने जोर धरल्यावर उद्योगपती रतन टाटा यांनी नेटकऱ्यांचे ट्विट करुन आभार मानले, तसेच भारत रत्न देण्याची मागणी करणारी मोहिम थांबवावी असे रतन टाटा यांनी म्हटले आहे. रतन टाटा यांनी ट्विट केले आहे की, मला भारत रत्न पुरस्कार मिळावा यासाठी सोशल मिडियावर तुम्ही केलेल्या मागणीचा आणि तुमच्या भावनांचा आदर करतो. परंतु माझी एक विनंती आहे की, ही मोहीम थांबवावी. मी भारतीय असल्याने स्वतःला भाग्यवान समजतो. देशाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी मी माझे प्रयत्न व योगदान देतच राहील असे रतन टाटा यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

भारतीय मोटीवेशनल स्पीकर डॉ.विवेक बिंद्रा यांनी ट्विट करत भारतीय उद्योगपती रतन टाटा यांना भारत रत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी रतन टाटा यांना भारत रत्न पुरस्कार देण्याची मागणी करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. विवेक बिंद्रा यांनी म्हटले आहे की, रतन टाटा यांनी भारताच्या विकासासाठी अमूल्य योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांनाही भारत रत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी विवेक बिंद्रा यांनी ट्विट करत दिली होती.

- Advertisement -

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -