घरमुंबई...म्हणून उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यावर रामदास आठवले नाराज

…म्हणून उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्यावर रामदास आठवले नाराज

Subscribe

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याबद्दलचे नाराजी पत्रच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गुरुवारी २८ नोव्हेंबर रोजी शिवतीर्थावर शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षातील प्रमुख नेतेसुद्धा उपस्थित होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सुद्धा उपस्थित होते. पण उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याबद्दलचे नाराजी पत्रच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

रामदास आठवले का नाराज झाले?

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट करत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, “राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणे नैतिक दृष्टीने योग्य असल्याने तसेच या शपथविधी सोहळ्याचे रितसर निमंत्रण प्राप्त झाल्याने मी या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहिलो.” ते पुढे म्हणाले की, नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यक्तीशः आमचे चांगले मित्र आहेत. शिवशक्ती-भीमशक्ती महायुती आम्ही एकत्र केली. त्यातून राज्यात सत्तांतर घडले. तसेच मुंबई महापालिकेत ही शिवसेनेची सत्ता अबाधित राहिली. शिवशक्ती-भीमशक्ती एकजुटीमुळे आमची मैत्री घनिष्ठ झाली. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला उपस्थित राहून त्यांचे रिपाइं तर्फे हस्तनांदोलन करून अभिनदंन केले. मात्र केंद्रीय राज्यमंत्री म्हणून राजशिष्टाचार धोरणानुसार मला पुढील रांगेत आसनव्यवस्था देणे क्रमप्राप्त होते. या शपथविधी सोहळ्यात राजशिष्टाचार न पाळता केंद्रीय राज्यमंत्री पदावर असतानाही मला मागील रांगेत बसविण्यात आले.” दरम्यान घडलेल्या प्रकाराबाबत रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आठवले यांनी घडलेल्या प्रकाराची माहिती पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे.

- Advertisement -

राजशिष्टाचार मोडला

या शपथविधी सोहळ्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेशद्वार क्र. २ ने प्रवेश दिला जात असताना केंद्रीय राज्यमंत्री म्हणून माझ्या वाहनाला प्रवेशद्वार क्र. ७ ने प्रवेश दिल्याने राजशिष्टाचार मोडण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही लक्ष द्यायला पाहिजे होते, अशी नाराजी रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -