घरमहाराष्ट्रनाशिकगोदावरीतून स्मार्ट कामांसाठी ठेकेदाराकडून सर्रास पाणीचोरी

गोदावरीतून स्मार्ट कामांसाठी ठेकेदाराकडून सर्रास पाणीचोरी

Subscribe

स्वप्निल येवले । पंचवटी

गेल्या अनेक दिवसांपासून स्मार्ट सिटी कंपनीकडून गोदापार्कसह गंगाघाटावर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. सध्या साईकिरण धाम मंदिरामागील पार्किंगच्या मोकळ्या जागेवर दगडी फरशी बसविण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी स्मार्ट सिटी कंपनीकडून ज्या ठेकेदाराला काम देण्यात आले आहे, त्याने थेट गोदावरी नदीपात्रातून पाण्याचा उपसा केल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे यासाठी या ठेकेदाराने नदीपात्रात थेट मोटर टाकली आहे.

- Advertisement -

कोणतेही काम करताना त्याासठी लागणार्‍या पाण्याची साठवण करणे व पाण्याचा टँकर मागविणे अपेक्षित असते. मात्र, या ठेकेदाराने परस्पर कोणतीही परवानगी न घेता हा उपसा सुरू केल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नदीपात्रातील पाण्यावर जलसंपदा विभागाची मालकी असते. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून अनेकदा ग्रामीण भागातील शेतकर्‍यांवर धरण, नदी किंवा पाटातून उपसा करण्यासाठी टाकण्यात येणार्‍या मोटर जप्त करत दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे आता या ठेकेदारावर कारवाई कधी होणार हा प्रश्न उपस्थित होत आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार पालिका व पोलीस यांच्याकडून नदी प्रदूषण रोखण्यासाठी काही कर्मचारी गोदाघाटावर तैनात करण्यात आले आहेत. एखादा भाविक नदीपात्रात कपडे किंवा वाहन धुताना दिसले तर त्यांच्यावर तिथे नियुक्त कर्मचारी लगेचच ओरडतात आणि कारवाई करत असतात. मात्र, या कर्मचार्‍यांना नदीपात्रात टाकलेली मोटर दिसत नाही की मुद्दाम डोळेझाक केली जाते आहे, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

- Advertisement -
दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोण घेणार ?

परस्पर पाण्याचा उपसा करणार्‍या ठेकेदारावर स्मार्ट सिटी कंपनीकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच, पाण्याचा उपसा करण्यासाठी आवश्यक वीजपुरवठा ठेकेदाराने कुठून घेतला, याचा तपास महावितरण व पालिकेच्या विद्युत विभागाने करण्याची गरज आहे. वीजप्रवाह नदीपात्रात उतरुन दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी महापालिका घेणार की स्मार्ट सिटी कंपनी, हेदेखील स्पष्ट होण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -