घरमुंबईफोन बॅकअपमुळे 'तो' नराधम बाप गेला तुरुंगात

फोन बॅकअपमुळे ‘तो’ नराधम बाप गेला तुरुंगात

Subscribe

आरोपीची दुसरी पत्नी आपल्या पतीचा मोबाईल चेक करत असताना, तिला आपल्या सावत्र मुलीचे (पीडितेचे) काही अश्लिल फोटो मिळाले.

मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही कामांसाठी करणारे लोक आपल्या समाजात आहेत. मोबईल टेक्नॉलॉजी ही माणसाच्या फायद्यासाठी विकसीत करण्यात आली असली, तरी त्याचा फायदा करुन घ्यायचा की गैर वापर करायचा हे प्रत्येकाच्या हातात असतं. काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे मोबाईलचा गैरवापर करुन आपल्याच मुलीचा लैंगिक छळ करणाऱ्या एका नराधम पित्याला अंधेरीमधून अटक करण्यात आली होती. अंधेरीच्या डी.एन.नगर परिसरात राहणारा हा नराधम बाप मोबाईलवर पॉर्न पाहून आपल्या अल्पवयीन मुलीकडून हस्तमैथुन करवून घ्यायचा. मात्र, या अशा घाणरेड्या वृत्तीच्या माणसाचं बिंग उघड पाडण्यासाठी अखेर मोबाईल फोनच कामी आला. आरोपी आपल्या मुलीसोबत करत असलेल्या गैरवर्तनाचे पुरावे मोबाईल ‘बॅकअप’मुळे पोलिसांसमोर आले आणि त्याची रवानगी थेट तुरुंगामध्ये झाली. आरोपीची दुसरी पत्नी आपल्या पतीचा मोबाईल चेक करत असताना, तिला आपल्या सावत्र मुलीचे (पीडितेचे) काही अश्लिल फोटो मिळाले. याबाबत तिने पतीकडे विचारणा केली असता, त्याने उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तेव्हापासूनच तिने आरोपीच्या मोबाईलचा बॅकअप घ्यायला सुरुवात केली.

पोलीस कोठडीतून तुरुंगात

सुरुवातील जेव्हा या पीडित मुलीने आपल्या सावत्र आईला घडलेल्या प्रकाराविषयी सांगितले, तेव्हा त्या मायलेकींनी लगेचच पोलीस कोठडीत धाव घेतली. त्यानंतर संपूर्ण घटनेचं सत्य जाणून घेत, डी एन नगर पोलिसांनी त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. यादरम्यान, करण्यात आलेल्या चौकशीमध्ये आरोपी कलीमुद्दीन मुस्तकीन शेख (४०) दारूच्या नशेत त्याच्या १३ वर्षीय मुलीसोबत हे अश्लिल कृत्य करत असल्याचं समोर आलं. मात्र, त्यानंत पीडितेच्या सावत्र आईने मोबईल बॅकअपमधून मिळालेल्या त्या फोटोंची माहिती नातेवाईकांच्या साहाय्याने पोलीसपर्यंत पोहचवली. बॅकअपमध्ये मिळालेल्या डेटावरुन आरोपी गेल्या दीड वर्षांपासून आपल्याच मुलीसोबत हे घाणेरडे कृत्य करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणांची गंभीर दखल घेत पोलिसांनी कलीमुद्दीन याची थेट तुरुंगात रवानगी केली. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर आरोपीची दुसरी पत्नी उत्तर प्रदेशला आपल्या माहेरी परतली असल्याचं समजतंय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -