घरमुंबईदुष्काळाच्या मुद्दयावर शिवसेनेच्या आज बैठका

दुष्काळाच्या मुद्दयावर शिवसेनेच्या आज बैठका

Subscribe

सकाळी ११ वाजता सेनाभवनात ही बैठक होणार असून या बैठकीला शिवसेनेचे संपर्क नेते, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, समन्वयक आणि सचिवांची उपस्थिती असणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईत होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी ११ वाजता सेनाभवनात ही बैठक होणार असून या बैठकीला शिवसेनेचे संपर्क नेते, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, समन्वयक आणि सचिवांची उपस्थिती असणार आहे. या बैठकीतून उध्दव ठाकरे निवडणुक तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजता उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद असणार आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सर्व मंत्र्यांना राज्यातल्या दुष्काळ पहाणी दौरा करुन दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे यावेळी देखील शिवसेना दुष्काळाच्या मुद्द्यावरुन सरकारला कोंडीत पाडण्याच्या तयारीत आहे. तसंच सरकारी योजना जनतेपर्यंत पोहचतात की नाही याची देखील तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 

नुसती आश्वासनं, जनतेच्या नशिबी दगडधोंडेही नाहीत – शिवसेना

- Advertisement -

‘शिवसेना सोबत राहावी’; रावसाहेब दानवेंची इच्छा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -