घरदेश-विदेशहायटेक चोर- गुगल मॅपच्या सहाय्याने करत होता चोरी

हायटेक चोर- गुगल मॅपच्या सहाय्याने करत होता चोरी

Subscribe

तंत्रज्ञानाचा वापर करून चोरी करतानाचे अनेक प्रकार आपण चित्रपटात बघतो. हैद्राबाद पोलिसांनी नुकत्याच पकडलेल्या चोरानी केली अशा प्रकारे चोरी.

चोरी ही एक कला आहे असे आपण चोरांच्या तोंडातून नेहेमीच ऐकत असतो. अशा प्रकारचे संवाद फक्त चित्रपटातच शोभा देतात. प्रत्यक्ष आयुष्यात अशा पद्धतीने चोरी करणे हे महागात पडू शकते. जगातील कोणत्याही कामांमध्ये झोपूशकतो मात्र बिना आराम घेता फक्त चोरीचेच काम करु शकतो असे मत अनेक चोरांनी मांडले आहे. वेळे नुसार चोरीच्या पद्धतीही बदलत जातात. चोरी करण्यामध्ये चोर नेहेमी एक पाऊल पुठेच राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र अखेर गुन्हा करणारा कोणती ना कोणती चूक करतोच. हैद्राबाद पोलिसांनीही एका चोराला पकडले आहे. या चोरांनी चोरी करण्याच्या पद्धती सांगितल्यानंतर पोलिसही आश्चर्यचकीत झाले आहेत. तंत्रज्ञानाचा आसाही वापर बघून पोलिसांनी आपला तपासात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे वाटू लागले आहे. दरम्यान या हायटेक चोराला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयासमोर उभे केले आहे.

काय आहे चोरीची पद्धत

साथीया रेड्डी असे या चोराचे नाव आहे. हैद्राबाद येथे चोरी करताना पोलिसांनी त्याला नुकतीच अटक केली आहे. साधारणता आपण गुगल मॅपचा वापर रस्ता किंवा एखादे ठिकाणी शोधण्यासाठी करतो. वेळेनंतर गुगल मॅपमध्ये विविध फिचर्स आलेत. यामध्ये तुम्हाल जवळचे हॉटेल किंवा आपल्या जवळील परिसराचीही माहिती मिळते. या तंत्राचाच वापर करून हा चोर इतर शहरातील उच्चभ्रूवस्ती परिसराचा शोध घेतो. यानंतर विमानाने प्रवास करून त्या शहरात जाऊन परिसराचे निरिक्षण करतो. मोठी घरे किंवा घराच्या बाहेर ठेवलेल्या सामनावरून हा चोर अंदाज लावतो. यानंतर घरात कोणही नसताना घरफोडी करतो. मागील काही वर्षांपासून आपले काम हा पूर्ण चोख करत होता. घटनास्थळी हा कोणताही पूरावा राहणार नाही याची काळजी घेत होता. त्यामुळे पोलिसांनाही त्याला अटक करण्यास अडथळे निर्माण होत होते.

- Advertisement -

हैद्राबाद येथे अटक

साथीया रेड्डी हा मूळ आंध्र प्रदेशचा राहिवासी आहे. तेलंगना येथील हैद्राबादमध्ये तो चोरीच्याच उद्देशाने आला होता. यावेळी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्याला रंगे हाथ अटक करण्यात आली. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने अवलंबलेली चोरीची पद्धत पोलिसांना सांगितली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -