घरठाणे'व्हॅलेंटाइन डे'ला अवघ्या आठ तासांत मुंबई-ठाण्यातील ९० जोडपी अडकणार विवाह बंधनात

‘व्हॅलेंटाइन डे’ला अवघ्या आठ तासांत मुंबई-ठाण्यातील ९० जोडपी अडकणार विवाह बंधनात

Subscribe

रजिस्टर विवाहासाठी एक महिना अगोदर रजिस्टर कार्यालयात नोंदणी करावी लागते. विवाहासाठी जोडप्याचा वयाचा व पत्याचा दाखला देणारी कागदपत्रे नोंदणी कार्यालयात जमा करावी लागतात. त्यानंतर विवाहासाठी संबंधित तारखेची नोंदणी केली जाते. विवाहासाठी दोन साक्षीदारही आवश्यक असतात. ठरलेल्या तारखेला विवाह केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्रही दिले जाते.

मुंबईः प्रेमाची कबुली देण्याचा दिवस म्हणजे १४ फेब्रुवारी. या दिवशी प्रेमाची कबुली देण्यासाठी विविध युक्त्या लढवल्या जातात. कुणी चॉकेलट आणि फुल देऊन प्रेमाची कबुली देत तर कुणी अजून काहीजण ठरवून प्रियकराला स्मरणात राहिल अशी भेट देतात. या दिवशी विवाह करण्याचे नियोजनही काही जोडपी करत असतात. मुंबई ठाण्यातून अशा तब्बल ९० जोडप्यांनी रजिस्टर विवाहासाठी नोंदणी केली आहे. हे ९० विवाह सरकारी कामकाजाच्या वेळेत म्हणजे आठ तासांत होणार आहेत.

रजिस्टर विवाहासाठी एक महिना अगोदर रजिस्टर कार्यालयात नोंदणी करावी लागते. विवाहासाठी जोडप्याचा वयाचा व पत्याचा दाखला देणारी कागदपत्रे नोंदणी कार्यालयात जमा करावी लागतात. त्यानंतर विवाहासाठी संबंधित तारखेची नोंदणी केली जाते. विवाहासाठी तीन साक्षीदारही आवश्यक असतात. ठरलेल्या तारखेला विवाह केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्रही दिले जाते.

- Advertisement -

त्यानुसार मुंबईतून सुमारे दहा जणांनी रजिस्टर विवाहासाठी नोंदणी केली आहे. तर उपनगरातून ३० जणांनी विवाहासाठी नोंदणी केली आहे. ठाणे जिल्ह्यातून ५० जणांनी विवाहासाठी नोंदणी केली आहे. रजिस्टर विवाहासाठी शंभर रुपये नोंदणी शुल्क घेतले जाते, अशी माहिती adv परेश देसाई यांनी दिली.

एखाद्या जोडप्याला घरी विवाह करायचा असल्यास रजिस्ट्रारला घरी बोलवण्याची व्यवस्थाही असते. त्याचीही नोंदणी एक महिना अगोदर करावी लागते. व्हलेंटाईन डेसाठी रजिस्ट्रारचेही तीन ठिकाणी बुकींग झाले आहे.

- Advertisement -

रजिस्टर विवाह व्यतिरिक्त मंदिर, विवाह हॉल  किंवा अन्य धार्मिक स्थळी व्हलेंटईनच्या दिवशी विवाह करण्याचा मुहुर्त अनेक जोडपी ठरवतात. त्याची अधिकृत नोंद दुसऱ्या स्पष्ट होते. धार्मिक स्थळी विवाह केल्यानंतर तेथून त्याचे प्रमाणपत्र दिले जाते. ते प्रमाणपत्र स्थानिक महापालिका कार्यालयात द्यावे लागते. दोन साक्षीदारांची कागदपत्रेही द्यावी लागतात. साक्षीदाराने स्वाक्षरी केल्यावर पालिकेकडून विवाहाचे प्रमाणपत्र दिले जाते.

वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर विवाह लावून देणाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. कुटुंबाचा विरोध असणारी अनेक जोडपी तेथे विवाह करतात. त्या ठिकाणी भटजीपासून मौलवीची व्यवस्था असते. जोडपे कोणत्याही धर्माचे असो त्यांच्या पारंपारिक पद्धतीनुसार विवाह लावून दिला जातो. तसे पैसेही आकारले जातात. त्यांच्याकडून विवाहाची नोंदणी करण्याची प्रक्रियाही सांगितले जाते.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -