घरमहाराष्ट्रराज्यातील 12 वीच्या विद्यार्थ्यांना फटका; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रात्यक्षिक परीक्षा रखडल्या

राज्यातील 12 वीच्या विद्यार्थ्यांना फटका; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रात्यक्षिक परीक्षा रखडल्या

Subscribe

राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा अडचणींचा सामना करावा लागतोय. या आंदोलनामुळे बारावी बोर्डच्या प्रात्यक्षिक परीक्षा रखडल्या आहेत. 12 वीच्या बोर्डाची लेखी परीक्षा अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र अद्याप विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल परीक्षा न झाल्याने ते चिंतेत सापडले आहेत. महाविद्यालयात लॅब असिस्टंट उपस्थित नसल्याने आता प्रात्यक्षिक परीक्षा द्यायच्या कशा? असा प्रश्न शिक्षण आणि विद्यार्थ्यांना पडला आहे.

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालय आणि पदवी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर गेले आहेत, तसेच त्यांनी परीक्षांच्या कामावरही बहिष्कार टाकला आहे. 1 फेब्रुवारीपासून 12 वी बोर्डाच्या प्रात्याक्षिक परीक्षा सुरु झाले आहेत तर दुसरीकडे शिक्षकेत्तर कर्मचारांनी या परीक्षांसाठी कुठलेही सहकार्य न करता कामावर बहिष्कार टाकला आहे याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागतोय. या आंदोलनामुळे शिक्षक आणि बारावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय, अशात बारीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे धोक्यात आले आहे.

- Advertisement -

महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदं तात्काळ भरण्यास मान्यता द्यावी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यांसाठी महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.

12 वी बोर्डाच्या लेखी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत. यामुळे 16 फेब्रुवारीपासून प्रात्यक्षिक परीक्षा पूर्ण होणं गरजेचं होतं मात्र अनेक महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यास शिक्षकेत्तर कर्मचारी संपावर असल्याने आता बायोलॉजी, केमिस्ट्री फिजिक्स यासारख्या विषयांच्या प्रॅक्टिकल परीक्षा अद्याप होऊ शकल्या नाहीत. अवघ्या 8 दिवसांवर बारावी बोर्डाच्या परीक्षा आहे यात अनेक विद्यार्थ्यांच्या तीन ते चार विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आता प्रात्यक्षिक परीक्षांवर लक्ष केंद्रीत करायचं की लेखी परीक्षांची तयारी करायची? अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक परीक्षांवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई बोर्डाने दिलं आहे. तसेच अनेक महाविद्यालयातील प्रात्यक्षिक परीक्षा वेळेत पूर्ण झाल्या असून काही कॉलेजमध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा पूर्ण होतील. यासह महाविद्यालयांना पूर्णपणे सहकार्य केलं जाईल असं मुंबई बोर्डाने सांगितले, मात्र शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना बोर्डाकडून कुठल्याही प्रकारचं सहकार्य मिळत नसल्याने विद्यार्थी आणि शिक्षक अडचणीत सापडले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने यात तातडीने लक्ष घालत योग्य तोडगा काढण्याची गरज असल्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.


अनिल देशमुखांनाही भाजपकडून ऑफर; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -