घरमुंबईतब्बल १६ तासानंतर रेल्वे सुरू पण…

तब्बल १६ तासानंतर रेल्वे सुरू पण…

Subscribe

रेल्वे सुरू झाली असली तरी ठाण्याच्या पुढे गाड्या येत नाहीयेत. स्थानकावर उदघोषणाही सुरू नाहीये. यामुळे प्रवासी वैतागले आहेत.

दोन दिवस सतत सुरू असणाऱ्या पावसाचा फटका रेल्वेला बसला. तिन्ही मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झाला. हर्बर आणि मध्यरेल्वे ठप्प झाली होती. अखेर सोळा तासानंतर रेल्वेवाहतूक पुर्ववत झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे तर हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द स्टेशनदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक धीम्यागतीने सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

मध्यरेल्वे ने ट्विट करत ही माहिती दिली. पावसाळा म्हटलं की दरवर्षी मुंबई करांना रेल्वे वाहतूकीच्या त्रासाला सामोरे जावे लागते. रेल्वे सेवा ठप्प होणे, रूळावर पाणी साचणे याचा नाहक त्रास चाकरमान्यांना सहन करावा लागतो.

आजही सकाळपासून कर्जतहून सीएसएमटीकडे निघालेल्या रेल्वेगाड्या ठाणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येत होत्या. त्यामुळे आम्ही अजून किती दिवस त्रास सहन करायचा असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत. अजूनही रेल्वे सुरू झाली असली तरी ठाण्याच्या पुढे गाड्या येत नाहीयेत. स्थानकावर उदघोषणाही सुरू नाहीये. यामुळे प्रवासी वैतागले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -