घरमुंबईमध्य रेल्वेवर युटीएस अ‍ॅपला प्रंचड प्रतिसाद

मध्य रेल्वेवर युटीएस अ‍ॅपला प्रंचड प्रतिसाद

Subscribe

युजर्सची संख्या ६ लाख

मुंबईतील तिकीट खिडक्यांवरील वाढत्या गर्दीपासून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने युटीएस अ‍ॅपची निर्मिती केली होती. त्याला मध्य रेल्वेच्या प्रवशांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहेत. सध्या मध्य रेल्वेच्या युटीएस अ‍ॅप युजर्सची संख्या ६ लाखांच्या घरात गेली आहेत. ही आतापर्यंतची युटीएस अ‍ॅप युजर्सची सगळ्यात जास्त संख्या असल्याने मध्य रेल्वेने आपल्या नावाने पुन्हा एक नवा विक्रम नोंदवला आहे.

रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी २०१५ मध्ये युटीएस नावाचे मोबाईल अ‍ॅप तयार केले होते. हे अ‍ॅप सेंटर फॉर रेल्वे इंफॉर्मेशन सिस्टम (सीआरआयएस) कडून तयार करण्यात आले होते. रेल्वेने हे अ‍ॅप मोबाईलवर उपलब्ध करून दिले आहे. ते अनारक्षित (अनरिझर्व्ह) तिकिटांसाठी आहे. मागील दोन वर्षात या अ‍ॅपकडे प्रवाशांनी पाठ फिरवली होती. त्यांनतर रेल्वे बोर्डाने मिशन मोडवर या अ‍ॅपची जनजागृती मोहीम हाती घेतली होती. त्याला प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दिला.

- Advertisement -

एप्रिल २०१७ ला या युटीएस मोबाईल अ‍ॅपचे युजर्स एकूण ३ लाख ७४ हजार इतके होते. मात्र आता फक्त मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील युटीएस अ‍ॅप युजर्सची एकूण संख्या ६ लाख २३ हजार ३०८ इतकी झाली आहे. रेल्वे मार्गावरील एकूण प्रवासी संख्येच्या १०.१४ टक्के संख्या युटीएस अ‍ॅप युजर्सची आहे. यासह युटीएस अ‍ॅपद्वारे तिकिट काढल्यावर पाच टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे प्रवाशांमध्ये युटीएस अ‍ॅपची पसंती वाढली असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

अशी आहे युजर्सची टक्केवारी

- Advertisement -

सीएसएमटी = १८.१२
ठाणे = १९.८९
अंबरनाथ = १२.४०
कल्याण = १९.४८
बदलापूर = १५.३६
पनवेल = २२.४१
बेलापूर = २१.४६
खारघर = २३.२२
घणसोली = २१.६१
ऐरोली = १६.०२

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -