घरताज्या घडामोडीमहापालिकेच्या रुग्णालयांना रोटरी क्लबकडून १३८ व्हिलचेअरची भेट

महापालिकेच्या रुग्णालयांना रोटरी क्लबकडून १३८ व्हिलचेअरची भेट

Subscribe

मुंबई महानगरपालिकेच्या १८ रुग्णालयांना मिळून एकूण १३८ व्हिलचेअरचे वितरण गोरेगाव रोटरी क्लबकडून जिंदाल समूहाच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

कोविडच्या काळात खासगी स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेला मदतीचा हातभार लावलेला असून हा मदतीचा ओघ कोविड पुरताच न करता महापालिकेच्या रुग्णांलयांना सुरुच ठेवला आहे. महापालिकेच्या १८ रुग्णांलयांमध्ये येणाऱ्या दिव्यांग रुग्णांसाठी एकूण १३८ व्हिलचेअर गोरेगाव रोटरी क्लबच्या माध्यमातून जिंदाल कंपनीने उपलब्ध करून दिल्या आहेत.

१३८ व्हिलचेअरचे वितरण

दिव्यांग रुग्णांची ने-आण करणे सोयीचे व्हावे यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या १८ रुग्णालयांना मिळून एकूण १३८ व्हिलचेअरचे वितरण गोरेगाव रोटरी क्लबकडून जिंदाल समूहाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. महानगरपालिका मुख्यालयात स्थायी समिती अध्यक्ष दालनात गुरुवारी सकाळी व्हिलचेअर महानगरपालिकेकडे सोपवण्याबाबतचे पत्र रोटरी क्लबने सुपूर्द केले. उदयकुमार देसाई यांनी हे पत्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सोपवले. सोबत १० व्हिलचेअर देखील नायर रुग्णालयासाठी प्रदान करण्यात आल्या. महानगरपालिकेचे संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) तथा नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल, रेडिओलॉजी विभागप्रमुख डॉ. देव शेट्टी, डॉ. अलका सुब्रमण्यम् आदी याप्रसंगी उपस्थित होते.

- Advertisement -

रोटरी क्लब नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रणी असते. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर कामकाजाचा ताण आणखीनच वाढला आहे. अशाप्रसंगी दिव्यांग रुग्णांसाठी पुढे येत वेगवेगळ्या १८ रुग्णालयांना १३८ व्हिलचेअर प्रदान करुन गोरेगांव रोटरी क्लबने पुन्हा एकदा सेवाभावी वृत्ती प्रत्यय आणून दिला असल्याचे यशवंत जाधव यांनी त्यांचे आभार मानले.

गोरेगाव (पश्चिम) येथील रोटरी क्लब हा मागील २५ वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. मुंबईतील सर्वोत्तम क्लब म्हणून रोटरी जिल्हा परिमंडळात गोरेगांवचा गौरव देखील करण्यात आला आहे. या क्लबने मागील ८ वर्षांत शहरी आणि ग्रामीण भागात मिळून ८०० हून अधिक व्हिलचेअर वितरित केल्या आहेत. जिंदाल उद्योग समूहाचे संस्थापक कै. ओमप्रकाश जिंदाल यांच्या स्मृती प्रित्यर्थ जिंदाल फाऊंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदाल तसेच संचालक कांतिभाई पटेल यांच्या सहकार्याने या व्हीलचेअर्ससाठी गोरेगांव रोटरी क्लबला आर्थिक मदत मिळते. रोटरी क्लब आणि जिंदाल फाऊंडेशनने मुंबई महानगरपालिकेच्या विविध १८ रुग्णालयांना १३८ व्हीलचेअर देण्याचा निर्णय घेतला, असे रोटरीचे उदयकुमार देसाई यांनी स्पष्ट केले. यासाठी गोरेगांव रोटरी क्लबचे वैद्यकीय संचालक डॉ. सिद्धार्थ हरितवल  आणि महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव त्यांच्यासह पुष्कराज कोले, विष्णू माहेश्वरी, सुधीर कोप्पीकर, सखाराम गिरप, राजीव रंजन, तरुण जैन, नम्रता गोयंका आदींचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – हॉटेल उघडल्यानंतर आता राज्यात सिनेमागृहे, नाट्यगृहे सुरु होणार; सरकार सकारात्मक


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -