घरमुंबईदेशमुख, मलिकांचा मताधिकार कोणत्या न्यायाने नाकारला?

देशमुख, मलिकांचा मताधिकार कोणत्या न्यायाने नाकारला?

Subscribe

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि मंत्री नवाब मलिक यांना विधान परिषदेत मतदान करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना २ मतांची कमतरता भासणार आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता खून करणार्‍या आणि त्यासाठी शिक्षा सुनावलेल्या कैद्यालादेखील घटनेने मतदानाचा अधिकार दिला आहे. मग या दोन आमदारांना कोणत्या न्यायाने मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत म्हणाले की, अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला आहे. ३०२ कलमाखाली खून करणार्‍या आणि त्यासाठी शिक्षा सुनावलेल्या कैद्यालादेखील मतदानाचा अधिकार असतो. घटनेने त्यांना अधिकार दिलेला आहे. तुम्ही घटनेची कलमे पाहा, मात्र ज्यांना लोकांनी निवडून दिले आहे, ज्यांच्यावरील गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही, ज्यांची आमदारकी अजून शाबूत आहे, अशा विधिमंडळाच्या दोन सदस्यांना कोणत्या न्यायाने हा अधिकार नाकारण्यात आला याविषयी संभ्रम आहे.

- Advertisement -

हे सर्व दबावाखाली होत आहे. महाविकासआघाडीची दोन मते कमी करण्यासाठी राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत पडद्यामागून खेळ सुरू आहे. त्यामुळे देशाची लोकशाही, स्वातंत्र्य, न्यायव्यवस्था धोक्यात आली आहे, असा
आरोपदेखील संजय राऊत यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -