घरमनोरंजनफेक फोटो आणि अकाउंटबाबत सारा तेंडुकरने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

फेक फोटो आणि अकाउंटबाबत सारा तेंडुकरने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

Subscribe

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर हिचे खेळाडू शुभमन गिल याच्यासोबतचे फेक फोटो तयार करण्यात आले होते. जे व्हायरस झाल्यानंतर पहिल्यांदाच तिने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांत तंत्रज्ञानाचा अनेक गोष्टीसाठी गैरवापर करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तंत्रज्ञान शाप की वरदान असा प्रश्न निर्माण झाला आहे. एआय आणि त्यासारख्याच अन्य तंत्रज्ञानाचा वापर करून काही हॅकर्स चुकीच्या पद्धतीने फोटो तयार करत आहेत. तर अनेकांकडून सेलिब्रिटीजचे फेक अकाउंटदेखील तयार करण्यात आले आहे. ज्याचा नाहक त्रास सहन देखील सेलिब्रिटीजला सहन करावा लागला आहे. काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना हीचे डीपफेक फोटो तयार करून व्हायरल करण्यात आले होते. ज्याचा तिला नाहक त्रास सहन करावा लागला होता. याबाबतचे स्पष्टीकरण नंतर रश्मिकाने तिच्या सोशल मीडियावरून दिले. रश्मिका व्यतिरिक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर हिचे देखील खेळाडू शुभमन गिल याच्यासोबतचे फेक फोटो तयार करण्यात आले होते. परंतु, याबाबत साराकडून एक पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटला शेअर करण्यात आली आहे. (Sara Tendukar reacted for the first time regarding fake photos and accounts)

हेही वाचा – भर कार्यक्रमात सलमानने केलं गर्दीतील महिलेला किस; व्हिडीओ होतोय व्हायरल

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकर हिचा शुभमन गिलसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर ते दोघे नात्यात असल्याची चर्चा करण्यात येऊ लागली. मात्र वास्तविक, साराचा मुळ फोटो हा तिचा भाऊ आणि क्रिकेटर अर्जुन तेंडुलकर याच्यासोबतचा होता. मात्र तंत्रज्ञानाच्या मदतीने अर्जुनच्या जागी शुबमनचा फोटो लावून तो फोटो व्हायरल करण्यात आला होता. त्याशिवाय, साराचे ट्विटरवर म्हणजेच X या सोशल मीडियावर अकाउंट नसतानाही तिचे फेक अकाउंट तयार करून शुबमन गिल याच्यासोबतचा फेक फोटो शेअर करण्यात आला. याबाबत आता पहिल्यांदाच साराकडून प्रतिक्रिया देण्यात आली आहे. साराने याबाबत नाराजी व्यक्त करत तिच्या इन्स्टाला पोस्ट लिहिली आहे.

सोशल मीडिया आपल्या सर्वांसाठी आनंद, दु:ख आणि दररोजत्या आयुष्यातील घडामोडी शेअर करण्याचं व्यासपीठ आहे. मात्र याचा दुरुपयोग ही चिंताजनक बाब आहे. माझ्यासंबंधित काही डीपफेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. ज्यात कोणतेही तथ्य नाही आणि सत्यही नाही. माझ्या नावाने सोशल मीडियावर आणि विशेषतः X या सोशल मीडियावर फेक अकाउंट असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. जाहीरपणे लोकांची दिशाभूल करण्याच्या हेतूने हे अकाउंट्स तयार करण्यात आले आहेत. माझे एक्सवर अकाउंट नाही. एक्सकडून या फेक एक्स अकाउंट्सवर कारवाई केली जाईल अशी आशा आहे, अशी पोस्ट साराने तिच्या इन्स्टाला शेअर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -