घरमहाराष्ट्रआदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा उद्देश वेगळाच; नितेश राणे यांची टीका

आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा उद्देश वेगळाच; नितेश राणे यांची टीका

Subscribe

ज्यांची संघटना खिळखिळी झाली त्यांना खळा बैठक शिवाय दुसरा पर्याय नाही असेही ते खोचकपणे म्हणाले.

-तेजस्वी काळसेकर

सिंधुदुर्ग : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 23 नोव्हेबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यानी बुधवारी (22 नोव्हेंबर) रोजी पत्रकार परिषदेत घेत आदित्य ठाकरेंना अनेक कोपरखळ्या मारल्या. आदित्य ठाकरे आपल्या दौऱ्यामध्ये खळा बैठका घेणार आहेत त्यावर खळा आणि आदित्य ठाकरे यांचा दौरा व गोव्यामध्ये असलेले फिल्म फेस्टिवल याचे काय साम्य आहे. सिंधुदुर्ग जिल्हावर खरंच आदित्य ठाकरे यांचे प्रेम आहे की, गोव्याची फिल्म फेस्टिवलमध्ये हजेरी लावून बॉलीवूडच्या लोकांसोबत पार्टी करायची आहे. सिंधुदुर्ग तो बहाना है, पेंग्विनको गोवा मे बॉलिवूड के ऍक्टरोकेसाथ नाचना है.! अशी टीका भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी केली. (The purpose of Aditya Thackerays Konkan tour is different Commentary by Nitesh Rane)

- Advertisement -

ज्यांची संघटना खिळखिळी झाली त्यांना खळा बैठक शिवाय दुसरा पर्याय नाही असेही ते खोचकपणे म्हणाले.
आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत ओम गणेश या आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. विविध विषयांवर भाष्य करतानाच आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर त्यांनी नेहमी प्रमाणे सडकून टीका केली.

बुधवारी सकाळी 10 जनपथ चा नवीन कामगार आज नॅशनल हेराल्डची बाजू मांडताना दिसला. जी बाजू नॅशनल हेराल्ड काँग्रेसचे काम करतो तेच काम आता सामना करत आहे. गांधी कुटुंबीयांवर झालेल्या कारवाईवर समर्थन करणे म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन करण्यासारखे आहे. संजय राऊत ते करत आहे. हेराल्डची भूमिका जी आहे तीच प्रबोधन ट्रस्टची सुद्धा आहे. आता दोघांचा ढाचा एकच झाला आहे. तिथे राहुल, सोनिया, इथे रश्मी, आदित्य आहेत. म्हणजे भ्रष्टाचार करण्यात सुद्धा साम्य आहे.

- Advertisement -

हेही वाचा : महाराष्ट्रातील समस्या सोडविण्याचे बळ अंगी येऊ दे; फडणवीसांचे विठूराया चरणी साकडं

देशाला 70 वर्षे गांधी कुटुंबाची लागलेली पनवती मोदींनी घालवली

राहुल गांधी यांनी पनवती या शब्दावर मोठं वक्तव्य करण्याचे धाडस केले आहे. 19 नोव्हेंबर स्व. इंदिरा गांधी जयंती होती मग भारत त्यादिवशी जिंकलाच पाहीजे होता. मग खरी पनवती कोण ? गेल्या 70 वर्षात देशात गांधी कुटुंबाची जी पनवती लागलेली होती ती नरेंद्र मोदी यांनी सत्ता बदल करून दूर केली आहे असे ते म्हणाले. फादर ऑफ द नेशन कसा असतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दाखवून दिलेले आहे. क्रिकेटची मॅच संपल्यानंतर उपविजेत्या ठरलेल्या भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूला भेटून त्याचे मनोधैर्य वाढवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एक नेता कसा असावा, एक पालक कसा असावा, राष्ट्रपिता कसा असावा याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजेच नरेंद्र भाई मोदी आहेत. याउलट राहुल गांधी हे अर्धे इटालियन आहेत जे भारताचे संपूर्ण नागरिक नाहीत, अशा राहूल गांधींना देश प्रेम कधीच कळणार नाही. अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी टीका केली.

हेही वाचा  : MLA Disqualification : दुसऱ्या दिवशीही सुनील प्रभूंना घेरण्याचा प्रयत्न; दोन्ही गटांच्या वकिलांत जुंपली

तेव्हा कळेल गृहखातं काय असतं तर…

भाजप मध्ये आल्यावर कोणाची प्रॉपर्टी मोकळी झाली ते सांगावं. ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांची प्रॉपर्टी जप्त होणार. ज्या डॉक्टर महिलेच्या घरावर दारूच्या बाटल्या मारल्या, त्यांना त्रास दिला. छळले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी गृह मंत्रालयाला अधिवेशनात करणार आहे. गृहमंत्री आणि त्यांचे खाते कसे आहे ते संजय राऊत यांना कळेल असेही ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे नावाचा वाघ होता. तेव्हा भाजपची त्या शिवसेने सोबत युती होती. आता उद्धव ठाकरे मुल्ला झाले आहेत. अशी ही टीका आमदार नितेश राणे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा उद्देश वेगळाच; नितेश राणे यांची टीका
Tejasvi Kalsekarhttps://www.mymahanagar.com/author/tejasvi-kalsekar/
तेजस्वी काळसेकर या प्रसारमाध्यम क्षेत्रात गेल्या ५ वर्षांपासून कार्यरत आहे. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करतात.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -