घरमुंबईसावित्रीबाई फुले नाट्यगृह मे अखेरीस खुले होणार; आयुक्तांचे आश्वासन

सावित्रीबाई फुले नाट्यगृह मे अखेरीस खुले होणार; आयुक्तांचे आश्वासन

Subscribe

गेल्या पाच महिल्यांपासून बंद असलेले सावित्रीबाई फुले रंगमंदिर मे अखेरीस खुले करण्यात येई, असे आश्वासन केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी डोंबिवलीकरांना दिले आहे.

गेल्या पाच महिल्यांपासून बंद असलेले सावित्रीबाई फुले रंगमंदिर मे अखेरीस खुले करण्यात येईल, असे आश्वासन केडीएमसी आयुक्त गोविंद बोडके यांनी डोंबिवलीतील एका शिष्टमंडळाला दिले आहे. तसेच नाटयगृहाचे ऑनलाईन बुकिंग करण्याची मागणीही आयुक्तांनी मान्य केली आहे. सावित्रीबाई फुले रंगमंदिर बंद असल्याने कलारिसकांमध्ये नाराजी असून पालिकेचे लाखो रूपयांच्या उत्पन्नावर पाणी फेरले जात आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून ‘आपलं महानगर’ने वृत्ताच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे.

आयुक्तांचे डोंबिवलीकरांना आश्वासन

डोंबिवलीतील विविध समस्यांसाठी नागरी अभिवादन न्यासाच्या एका शिष्टमंडळाने सोमवारी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. त्यावेळी विविध समस्या मांडण्यात आल्या. डोंबिवली ही सांस्कृतीक उपराजधानी आणि कलेचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र ऑक्टोबर २०१८ पासून सावित्रीबाई फुले रंगमंदिर दुरूस्तीसाठी बंद करण्यात आल्याची नाराजी शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे. रंगमंदिर लवकरात लवकर सुरू करावे, अन्यथा न्यासाच्या सर्व सदस्य आणि संस्था एकत्र येऊन कृती कारवाई करतील, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच सुदर्शननगरमधील ओलासुका कचऱ्याचा प्रश्न तसेच पूर्वेकडील सर्वच हॉटेल्सचे खरकटे अन्न गोळा करण्यासाठी येणारी घंटागाडी हॉटेल्सची वेळ संपण्यापूर्वी येत असल्याने उद्भवणारे प्रश्न शिष्टमंडळाने मांडले आहेत. त्यावरही संबंधित अधिकाऱ्याला बोलावून कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.

- Advertisement -

सावित्रीबाई फुले रंगमंदिर सुरू करताना नाट्यगृहाचे बुकिंग ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. हे शक्य असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केलेच, पण संबंधित उपस्थित अधिकाऱ्यांनी वेबसाईटमध्ये योग्य ते बदल करून तसेच स्मार्ट सिटी योजनेतील तरतुदींमध्ये याचा अंतर्भाव करण्याचे आश्वासन आयुक्तांसमोर दिले. या शिष्टमंडळात न्यासाचे मधुकरराव चक्रदेव, सुधीर जोगळेकर, माधव जोशी, प्रवीण दुधे, दर्शना सामंत, संदीप वैद्य, श्रीपाद कुळकर्णी, सचिन बोडस यांचा समावेश होता.


वाचा – सावित्रीबाई फुले नाट्यगृहात निवडणूक केंद्र

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -