घरताज्या घडामोडीमानखुर्दमध्ये बच्चे कंपनीसाठी सेल्फी पॉईंट; शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते लोकार्पण

मानखुर्दमध्ये बच्चे कंपनीसाठी सेल्फी पॉईंट; शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते लोकार्पण

Subscribe

मुंबईच्या मानखुर्द येथे बच्चे कंपनीसाठी एक नवे आकर्षण सुरू झाले आहे. शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसी) गेट समोरील कै. बिंदुमाधव ठाकरे उद्यानाजवळ उभारण्यात आलेल्या तारांगण सेल्फी पॉइंटचे लोकार्पण शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आले.

मुंबई : मुंबईच्या मानखुर्द येथे बच्चे कंपनीसाठी एक नवे आकर्षण सुरू झाले आहे. शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून भाभा अणुसंशोधन केंद्राच्या (बीएआरसी) गेट समोरील कै. बिंदुमाधव ठाकरे उद्यानाजवळ उभारण्यात आलेल्या तारांगण सेल्फी पॉइंटचे लोकार्पण शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी करण्यात आले. या लोकार्पणावेळी खासदार राहुल शेवाळे, माजी नगरसेविका कामिनी राहुल शेवाळे, विभागप्रमुख अविनाश राणे, महिला विभागप्रमुख सुनिता वैती यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. (Selfie point for kids company in Mankhurd Launched by school students)

तारांगणाची संकल्पना केंद्रस्थानी ठेवून उभारण्यात आलेला हा मुंबईतील पहिला सेल्फी पॉइंट असून खासदार राहुल शेवाळे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आला आहे. दादरच्या शिवाजी पार्क येथील सेल्फी पॉइंट उभारणारे आर्टिस्ट सुरेश तारकर यांनी फायबर आणि इतर सामुग्रीचा वापर करून हा तारांगण सेल्फी पॉइंट बनवला आहे.

- Advertisement -

सुमारे 150 फुटांवर उभारण्यात आलेल्या या सेल्फी पॉइंटमध्ये सहा फुटांचा सूर्य आणि त्याभोवती पृथ्वी सह अन्य ग्रह दाखविण्यात आले आहेत. याशिवाय अंतराळयान, आकाशात सोडलेला उपग्रह, चंद्र यांच्या प्रतिकृतिदेखील इथले खास आकर्षण ठरणार आहे.


हेही वाचा – मॉलमध्ये केवळ खरेदीसाठी लोक जात नाहीत…; हायकोर्टाची टिप्पणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -