घरमुंबईकल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर सेनेचे वर्चस्व

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर सेनेचे वर्चस्व

Subscribe

बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेना नेत्यांच्या पाठींबा दिलेले ८ उमेदवार विजयी झाले तर भाजप नेत्यांनी पाठींबा दिलेले ६, राष्ट्रवादीचे ३ आणि मनसेचा १  उमेदवार विजयी झाला आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली या  निवडणुकीत शिवसेना ८ भाजप ६ राष्ट्रवादी काँग्रेस ३ आणि मनसेचा १ असे उमेदवार विजयी झाले. बाजार समितीवर शिवसेनेने वर्चस्व मिळवले असून, भाजप राष्ट्रवादी आणि मनसेने केलेल्या हातमिळवणीला चांगलीच चपराक मिळाली आहे. त्यामुळे सभापतीपदासाठी शिवसेना व भाजपमध्ये चांगलीच स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

बाजार समितीच्या एकूण १८ जागांसाठी निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने १६ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते या निवडणुकीला १२१ गावांमधून मतदान झाले होते. या निवडणुकीत कोणत्याही पक्ष थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरला नव्हता. मात्र सर्वच पक्षामधील नेत्यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत शिवसेना नेत्यांच्या पाठींबा दिलेले ८ उमेदवार विजयी झाले तर भाजप नेत्यांनी पाठींबा दिलेले ६, राष्ट्रवादीचे ३ आणि मनसेचा १  उमेदवार विजयी झाला आहे.

- Advertisement -

मतदानाच्या वेळी गट क्र १२ मधील मतपेटीला अचानक आग लागून मतपत्रिका जळाल्याने ही निवडणूक चांगलीच गाजली होती. या मतदान केंद्रावर फेरनिवडणूक घेण्यात आली होती. या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड समर्थक उमेदवाराचा विजय झाला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची ताकत असली तरी तेथील गटात मनसे आणि राष्ट्रवादी पक्षाचे समर्थक उमेदवार जिकुंन आले. गट क्र. 15 मध्ये शिवसेनेचा पाठींबा असलेले उमेदवार व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती अरुण पाटील यांना परवाभवाची नामुष्की पत्करावी लागली. माजी सभापती रविंद्र घोडविंदे हे विजयी झाले आहेत. तसेच अर्जून चौधरी यांनी सुध्दा विजय मिळवलाय.  मनसेचे नेते राजू पाटील यांचा पाठींबा असलेले  गजानन पाटील विजयी झाले.तर मुरबाड विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गटात आमदार किसन कथोरे समर्थक विजयी झाले आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीच्यावेही भाजप राष्ट्रवादी आणि मनसे विरूध्द शिवसेना असे चित्र होते. त्यामुळे सभापतीपदाची माळ कोणत्या पक्षाच्या गळयात पडते  याकडं सर्वांचे लक्ष वेधलय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -