घरमुंबईसीवूडमध्ये विसर्जनावेळी ७ जणांना विजेचा धक्का; तिघांची प्रकृती चिंताजनक

सीवूडमध्ये विसर्जनावेळी ७ जणांना विजेचा धक्का; तिघांची प्रकृती चिंताजनक

Subscribe

या घटनेमुळे गणपती मंडळातील कार्यकर्ते हादरले आहेत. गंभीर जखमींवर डी. वाय. पाटील आणि अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

नवी मुंबईतील सीवूड येथे ‘सीवूडचा महाराजा’च्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान विजेचा धक्का लागून ७ कार्यकर्ते जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे गणपती मंडळातील कार्यकर्ते हादरले आहेत. गंभीर जखमींवर डी. वाय. पाटील आणि अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

हेही वाचा – गणपती विसर्जनात पोलिसांनी धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

अशी घडली घटना

गुरुवारी ‘सीवूडचा महाराजा’ची विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी सीवूड उड्डाणपुलावरून खाली उतरत असतानाच मध्यरात्रीनंतर १२.३०च्या सुमारास ही घटना घडली. या पुलावरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीला गणेशमूर्तीचा वरचा भाग लागला. त्यामुळे विद्युत वाहिनीची तार तुटली. यावेळी विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या सात भाविकांना विजेचा धक्का बसला. या घटनेत शाम झावरे, आशिष पारकर, हरिश्चंद्र फाळके, प्रसाद पिसे, योगेश निकम आदीजण जखमी झाले. त्यांना त्वरीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पैकी चार जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. उर्वरित तिघांची प्रकृती चिंताजनक असून एकाला पुढील उपचारासाठी डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. उर्वरित दोघांना उपचारासाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्याने दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -