घरमहाराष्ट्रसिंधुदुर्ग : विसर्जनाच्या वेळी आचरा समुद्रात दोघे बुडाले

सिंधुदुर्ग : विसर्जनाच्या वेळी आचरा समुद्रात दोघे बुडाले

Subscribe

सिंधुदुर्गमधील आचरा समुद्रकिनारी दोन जणांचा विसर्जनाच्या वेळी बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला…’ असा जयघोष करत पाणावलेल्या डोळ्यांनी संपूर्ण राज्यभरात विघ्नहर्त्या गणरायचं गुरुवारी विसर्जन करण्यात आले. ढोल – ताशांच्या गजरात बाप्पाला मोठ्या उत्साहात निरोप दिला गेला. मात्र, सिंधुदुर्ग येथील गणेशोत्सवाला याचे गालबोट लागले आहे. सिंधुदुर्ग येथील आचरा समुद्र किनारी गणपती विसर्जनासाठी गेलेले आचरा वरची वाडी येथील दोन तरुण बुडण्याची दुर्घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे.

दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू

आपल्या घरच्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी प्रशांत तावडे आणि एसटी महामंडळाचे ड्रायव्हर संजय परब समुद्रात गेले होते. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार गणपती पाण्यात सोडून परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडू लागले. जिवरक्षक रसिक जोशी यांनी जिवाची बाजी लावून त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याने जिवरक्षक यांचे प्रयत्न फोल ठरले. यावेळी सकलेन मुजावर, दिलिप पराडकर पोलीस पाटील जगन्नाथ जोशी विठ्ठल धुरी यांनी ही प्रयत्न केले. मात्र, त्यांचे ही प्रयत्न निष्फळ ठरले. सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षय धेंडे, कांबळे, महिला पोलीस मलमे यांच्यासह आचरा ग्रामस्थांनी उशिरा पर्यंत शोध मोहीम सुरू ठेवली होती. अखेर या दोघांचे मृतदेह सापडले आहेत.

- Advertisement -

लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये प्रशांत तावडे हे कर्मचारी म्हणून काम करत होते. तर संजय परब हे एसटी महामंडळाचे ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते.


हेही वाचा – गणपती विसर्जनानंतर सुबोध घेऊन येतोय बाप्पाला!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -