घरताज्या घडामोडीछत्रपतींच्या उल्लेखावर राज ठाकरेंच्या आरोपांना शरद पवारांचे उत्तर म्हणाले, शाहू, फुले,...

छत्रपतींच्या उल्लेखावर राज ठाकरेंच्या आरोपांना शरद पवारांचे उत्तर म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकर…

Subscribe

शाहू, फुले, आंबेडकरांचा उल्लेख करतो, त्याचा मला अभिमान - शरद पवार

राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर केलेल्या शिवछत्रपतींच्या उल्लेख टाळण्याबाबतच्या आरोपाला आज राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उत्तर देण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी अनेक आरोपांवर आज खुलासा केला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख, पुरंदरे यांच्या लिखाणाला विरोध, कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय, नास्तिक अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी खुलासा केला. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक आरोपांना उत्तरे दिली.

एखादी व्यक्ती वर्ष सहा महिन्यात वक्तव्ये बोलल्यानंतर फार गांभीर्याने घेण्यासारखी ही गोष्ट नसते. शिवाजी महाराजांचे नाव घेतले असा उल्लेख राज ठाकरेंनी केला. मी गेल्या काही दिवसांपूर्वीच अमरावतीला गेलो होतो. अमरावतीचे भाषण मागवले तर शिवाजी महाराजांचे योगदान या विषयावर २५ मिनिटांचे भाषण केले आहे. या भाषणामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आज मी वृत्तपत्रे वाचली पण वृत्तपत्रे वाचण्यासाठी सकाळी उठावे लागते असाही टोला शरद पवारांनी राज ठाकरेंना लगावला. फुले आंबेडकर शाहू उल्लेख करतो, त्याचा मला अभिमान आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

या राज्यात शिवछत्रपती यांच्याबाबत सविस्तर वृत्त काव्यातून महात्मा ज्योतिबा फुलेंनी सर्वात आधी लिहिले. शिवचरित्र, छत्रपतिंवर आस्था असलेले हे तिन्ही घटक आहेत. सत्तेचा वापर कसा करावा ही भूमिका तिघांनीही मांडली. त्यामुळे तिघांच्या विचारांची मांडणी करण्याचाच भाग आहे तो छत्रपतींच्या निमित्तानेही त्यांनी मांडला. म्हणूनच फुले, शाहू, आंबेडकरांचा उल्लेख करतो याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

पुरेंदरेंनी शिवछत्रपतींचा उल्लेख करताना जिजामातेने शिवाजी महाराजांना घडवले असा उल्लेख टाळला आहे. त्यांना दादाजी कोंडदेव यांनी घडवले असा उल्लेख पुरंदरेंनी केला. या गोष्टीला मी विरोध केला आहे. महाराजाचें व्यक्तिमत्व राजमाता जिजाऊने उभ केले, त्या व्यक्तीमत्वाचे मोठेपण आहे. त्यामुळे राजमातेचे योगदान टाळता येणार नाही. बाबासाहेबांनी वेगळे लिहिण्याचे प्रयत्न केला, ते मत योग्य नव्हते यासाठीच माझा विरोध होता. जेम्स लेन पुरंदरेंकडून माहिती घेतली पण या माहितीचा उल्लेख त्यांनी कधीच केला नाही.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -