घरमुंबई'मनसेकडून सभांचा खर्च मागणे अयोग्य'; पवारांनी सांगितला पु. ल. देशपांडेंचा किस्सा

‘मनसेकडून सभांचा खर्च मागणे अयोग्य’; पवारांनी सांगितला पु. ल. देशपांडेंचा किस्सा

Subscribe

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूीमीवर घेतलेल्या सभांच्या खर्चावर निवडणूक आयोगाने प्रश्न विचारले होते. या बाबतीत शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, पवार यांनी पु. ल. देशपांडे यांचा किस्सा सांगितला.

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार न उतरवताही जाहीर सभांचा धडाका लावला होता. ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत राज ठाकरे यांनी भाजपला चांगलेच जेरीस आणले होते. मात्र त्यानंतर त्यांनी घेतलेल्या सभांचा खर्च निवडणूक आयोगाने मागितला आहे. आज शरद पवार यांना याबाबत प्रश्न विचारला असता पवार यांनी १९७७ साली आणीबाणीत घडलेला एक प्रसंग सांगत राज ठाकरे यांचे समर्थन केले.

१९७७ ला आणीबाणी असताना निवडणूक झाली. पु. ल. देशपांडे हे राज्यभर सभा घेत होते. मात्र त्यांना त्यावेळी आयोगाने कोणताही खर्च मागितला नाही. पु. ल. देशपांडे यांच्यासह अनेक साहित्यिक, विचारवंत स्वतःहून निवडणुकीत सरकारविरोधात प्रचार करत होते, मात्र त्यांचा आवाज कुणीही दाबला नाही. लोकशाहीमध्ये मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे, यावर आयोग दडपशाही आणत आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

शरद पवार पुढे म्हणाले की, राज ठाकरे किंवा मनसे लोकसभा निवडणूक लढवत नाहीये, त्यामुळे त्यांना खर्च मागणे चुकीचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -