घरमुंबई'आत्ताचे गृहमंत्री फक्त पुष्पचक्र वाहण्यासाठी गडचिरोलीला जातात'

‘आत्ताचे गृहमंत्री फक्त पुष्पचक्र वाहण्यासाठी गडचिरोलीला जातात’

Subscribe

त्ताचे गृहमंत्री फक्त पुष्पचक्र वाहण्यासाठी गडचिरोलीला जातात. हे चित्र चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.

गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या गाडीवर केलेला हल्ला चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. दरम्यान, ‘मी मुख्यमंत्री असताना नक्षलवादाची सुरुवात झाली होती. पण आम्ही त्याकडे फक्त कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न म्हणून त्याकडे पाहीले नाही. तर विकासापासून वंचित राहिलेल्या या परिसराला विकासात कसे आणता येईल? याकडे लक्ष दिले. जर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले तर नक्षली लोकांच्या नाराजीचा फायदा उचलतात’, असे मत पवारांनी व्यक्त केले.

दरम्यान, पूर्वीचे राज्य असताना राज्याचे गृहमंत्री सांगलीचे असूनही त्यांनी गडचिरोलीचे पालकत्व घेतले होते, असे स्थानिक लोक मला सांगत होते. मात्र आत्ताचे गृहमंत्री फक्त पुष्पचक्र वाहण्यासाठी गडचिरोलीला जातात. हे चित्र चिंताजनक आहे. आर आर पाटील यांनी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेत जी सकारात्मकता आणली होती. आजचे सरकार अशाप्रकारचे कोणतेही कार्य करताना दिसत नसल्याचे पवारांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -