घरमुंबईयुतीची डिनर डिप्लोमसी

युतीची डिनर डिप्लोमसी

Subscribe

शिवसेना भाजपच्या आमदारांना वर्षा बंगल्यावर आज रात्री जेवण आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे.

शिवसेना-भाजप युतीनंतर आता पक्षाने पुढील कार्यक्रमास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर युती झाली मात्र दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही नाराजी असल्याचे सांगितले जात होते. यामुळेच दोन्ही पक्षांच्या आमदारांना वर्षा बंगल्यावर आज रात्री जेवणाचे आमंत्रण मिळाले आहे. या कार्यक्रमामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सायंकाळी साडेसात वाजता वर्षा बंगल्यावर या जेवणाचे कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात दोन्ही पक्षांच्या आमदारांनी मिळून काम करावे यावर चर्चा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासंदर्भात एक पत्रक जाहीर करण्यात आले आहे. हे पत्रक सर्व आमदारांना वाटण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -