घरमहाराष्ट्रनाणार प्रकल्पाचा फायदा की तोटा? पहा डॉक्यूमेंटरी

नाणार प्रकल्पाचा फायदा की तोटा? पहा डॉक्यूमेंटरी

Subscribe

नाणार प्रकल्प हा कोकणातील सध्या संवेदनशील विषय बनला आहे. या प्रकल्पाच्या पार्श्वभूमाीवर मुंबई मराठी पत्रकार संघ येथे एक डॉक्यूमेंटरी दाखवली जाणार आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून नाणार प्रकल्प हा कोकणातील संवेदनशील विषय बनला आहे. कोकणात अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाऊ नये, यासाठी तेथील स्थानिक नागरिक आंदोलने करत आहे. नाणार प्रकल्पामुळे निसर्गाचा ऱ्हास होईल आणि कोकणातील वातावरण असंतुलित होऊ शकते. त्यामुळे तेथील स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पामुळे तेथील आजूबाजूच्या स्थानिकांना भविष्यात भयावक गोष्टींना सामोरे जावे लागू शकते. कोकण हे किरणोत्सराचे आगार बनून त्याचे परिणाम हजारो वर्ष भोगत राहू नये म्हणून अजून ही संघर्ष सुरु आहे. हाच संघर्ष व्यापक करायचा भाग म्हणून अणुऊर्जेचे भयानक स्वरूप दर्शविण्यासाठी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी जनहक्क सेवा समिती (जैतापूर) आणि National Alliance for Anti Nuclear movements( NAAM) तर्फे वरील उल्लेखित डॉक्युमेंटरी दाखविण्यात येणार आहे. ही डॉक्यूमेंटरी २७ फेब्रुवारीला मुंबई मराठी पत्रकार संघ येथे संध्याकाळी साडे सहा ते साडे आठ दरम्यान दाखवली जाणार आहे. ही डॉक्यमेंटरी श्री प्रकाश यांनी तयार केलेली आहे. दरम्यान, सर्व निसर्ग प्रमी आणि कोकण प्रेमींनी ही डॉक्यूमेंटर बघायला यावी असे आवाहन जन हक्क सेवा समितीचे अध्यक्ष सत्यजीत चव्हाण यांनी केले आहे.

अणुऊर्जा प्रकल्पांमुळे निसर्गाचा ऱ्हास

अणुऊर्जा ग्रीन ऊर्जा असल्याचा भ्रम भले-भले पसरवीत असतात. अणुऊर्जेसाठी इंधन म्हणून संपृक्त युरेनियम लागते. हे बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर युरेनिअमचे खाणकाम करावे लागते. या खाणींच्या परिसरात साहजिकच किरणोत्सराचे प्रमाण वाढीस लागते. तसेच प्रचंड मातीचे ढीग ज्यावर प्रक्रिया केली जाते त्यातून 0.0२ ते0.१% च युरेनियम मिळते. मग उरलेला किरणोत्सारी कचरा परिसरातच मोठे बांध बांधून साठवला जातो. त्याने भूजल किरणोत्सारी होणे आणि हवेने किरणोत्सारी धूळ परिसरात पसरणे तसेच संपूर्ण जैविक साखळीत युरेनिअमचा शिरकाव होतो. याचे परिणाम मानवी शरीरावर होतात. कर्करोग, त्वचेचे रोग, पिढीजात व्यंग, स्त्रियांचे रोग, वांझपणा, शवसनाचे रोग यांचे परिणाम परिसरातील जनतेला भोगावे लागतात. मग ते ठिकाण झारखंडमधील जादूगौडा असो, अंधरप्रदेशातील असो, नायजर मधील असो किंवा अमेरिकेतील! सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. विकासाची किंमत माणूस आणि निसर्ग कुठेतरी चुकवतच असतो.

- Advertisement -

कोण आहेत श्री प्रकाश ?

श्री प्रकाश हे झारखण्डचे आहेत. त्यांनी जादूगौडा येथील युरेनियम खाणींच्या गंभीर परिणामांवर बुद्धा विप्स इन जादूगौडा ही डॉक्युमेंटरी बनविली होती. या डॉक्युमेंटरीला काही पुरस्कार मिळाले आहेत. श्रीप्रकाश यांनी अमेरिकेतील दक्षिण-पश्चिम भागातील युरेनियम खाणीमुळे झालेल्या परिणामाची डॉक्युमेंटरी बनविली आहे. या डॉक्युमेंटरीचे नाव NABIKEI असे आहे. NABIKE म्हणजे पाऊलखुणा. प्रस्तावित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प म्हणजे जगातील सर्वात मोठा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -