घरमुंबईशिवसेना नगरसेवकाची कोंबडी विक्रेत्याला मारहाण

शिवसेना नगरसेवकाची कोंबडी विक्रेत्याला मारहाण

Subscribe

शिवसेनेचे नगरसेवक आणि माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी कोंबडी विक्रेत्याला मारहाण केली आहे.

शिवसेनेचे नगरसेवक आणि माजी महापौर मिलिंद वैद्य यांनी माहीम मच्छिमार कॉलनी येथे कोंबड्या विक्रेत्यांना मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून परिसरातील नागरिकांना या कोंबडी विक्रेत्यांचा त्रास होत होता. एकाच वेळी ५ ते १० गाड्या उभ्या केल्याने या भागात वाहतूक कोंडी निर्माण होते. शिवाय त्यांची विष्ठा आणि पिसे यामुळे घाण आणि कचरा निर्माण होतो, असे स्पष्टीकरण मिलिंद यांनी दिले आहे.

शिवसेना नगरसेवकाने कोंबडी विक्रेत्याला दिला चोप

शिवसेना नगरसेवकाने कोंबडी विक्रेत्याला दिला चोप

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜುಲೈ 5, 2019

- Advertisement -

काय म्हणाले मिलिंद वैद्य?

मिलिंद वैद्य यांनी ‘आपल्या महानगरला’ दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, ‘माहीम मच्छिमार कॉलनी येथे होलसेल कोंबड्या विक्रेत्यांच्या गाड्या उभ्या केल्या जातात. या गाड्यातून हे विक्रेते किरकोळ विक्रेत्यांना तिथेच काट्यावर मापन करत कोंबड्यांची विक्री करतात. एकाच वेळी ५ ते १० गाड्या उभ्या केल्याने या भागात वाहतूक कोंडी निर्माण होते. शिवाय त्यांची विष्ठा आणि पिसे यामुळे घाण आणि कचरा निर्माण होतो. परिणामी विभागातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. याबाबत महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. मी माजी महापौर आहे, पाचवेळा नगरसेवक बनलो आहे. तरीही अधिकारी विभागातील तक्रारींकडे लक्ष देत नाही. मुंबईत कुणी थुंकले तरी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, मग अशाप्रकारे घाण करणाऱ्यांवर महापालिका कारवाई का करत नाही. त्यामुळे जे काम अधिकारी करत नाही, ते रस्त्यांवर उतरून आम्ही करतो. त्यामुळे रस्त्यांवर उतरवून त्यांना चापटवून धडा शिकवण्याची वेळ आली. जनतेला त्रास होणार असेल तर कायद्याच्या मार्गाने आम्ही मागणी करू, पण त्यानंतरही प्रशासनाचे अधिकारी ऐकत नसतील तर आम्ही सक्षम आहोत.’


हेही वाचा – Budget 2019 : भारत सरकार गरिबांसाठी कोट्यवधी घरे बांधणार

- Advertisement -

हेही वाचा – Budget 2019 : महिला आणि विद्यार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात ‘या’ तरतूदी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -