घरताज्या घडामोडीशिक्षण समिती अध्यक्षपदी सेनेच्या संध्या दोशी

शिक्षण समिती अध्यक्षपदी सेनेच्या संध्या दोशी

Subscribe

काँग्रेसच्या उमेदवार हंडोरे यांचा अर्ज मागे घेतला. तर भाजपसह काँग्रेसची ३ मते सेनेने फोडली.

मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शेवटच्या क्षणाला काँग्रेस उमेदवार संगीता हंडोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. काँग्रेसने आपला अर्ज मागे घेतल्याने शिवसेना उमेदवार संध्या दोशी यांना मार्ग सुकर झाला. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यात झालेल्या लढाईत संध्या दोशी या विजयी होत शिक्षण समिती अध्यक्ष पदी त्यांची निवड झाली. मात्र, शिवसेनेला धडा शिकवायला निघालेल्या भाजपचीच दोन आणि काँग्रेसचे १ अशा प्रकारे तीन मते बाद ठरली. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या सदस्यांनी शिवसेनेला उघड मदत करत तर काँग्रेसने तटस्थ राहत आघाडी धर्म पाळला. भाजपच्या सदस्यांनी चुकीचे मतदान केले असले तरी सेनेने त्यांची ही मते फोडून एकप्रकारे त्यांना कात्रजचा घाट दाखवला.

शिक्षण व स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेबरोबर भाजप आणि काँग्रेसने आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याने १ चुरस निर्माण झाली होती. काँग्रेस निवडणूक मैदानात उतरल्याने भाजप कुटनीतीचा अवलंब करेल आणि यामुळे होणाऱ्या संभाव्य दगाफटक्याची शक्यता लक्षात घेता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसची मनधरणी केली. या यशस्वी मध्यस्थीनंतर काँग्रेसने अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार शिक्षण समितीत काँग्रेस उमेदवार संगीता हंडोरे यांनी आपला अर्ज शेवटच्या १५ मिनिटांच्या अवधीत मागे घेतला. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप अशा रंगलेल्या या लढाईत काँग्रेसने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तरीही काँग्रेसच्या एका सदस्याने शिवसेनेला मतदान केले तर ३ सदस्य हे तटस्थ राहिले. तर भाजपचे उमेदवार सुरेखा पाटील यांना ३ मते कमी पडली. मात्र ही २ मते फोडत शिवसेनेने भाजपचे दात त्यांच्याच घशात घातले. त्यामुळे सेनेच्या उमेदवार संध्या दोशी यांना १३ मते तर भाजप उमेदवाराला ९ तुलनेत ७ मते मिळाली. त्यामुळे भाजपची २ मते फुटली गेली, या दोन्ही सदस्याने आवाजी मतदान पक्षाच्या उमेदवाराला तर प्रत्यक्ष स्वाक्षरी करताना सेनेच्या उमेदवाराच्या नावापुढे केली. त्यामुळे ही दोन मते बाद ठरल्याने भाजपच्या उमेदवाराची दोन मते कमी झाली.

- Advertisement -

शिक्षण समितीतील पक्षीय मतदान

शिवसेना : ११ अधिक दोन राकाँ आणि सपा: १३
भाजप उमेदवार: ९ वजा सेनेच्या उमेदवाराला पडलेली २ मते: एकूण मते ७
काँग्रेस माघार: एकूण ४ पैकी ३ तटस्थ आणि १ सेनेला
राष्ट्रवादी काँग्रेस: १ सदस्याने शिवसेनेला केले मतदान
सपा: १ सदस्याने शिवसेनेला मतदान केले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -