घरमुंबईचाणक्यनिती : BMC मध्ये सहा विशेष समित्यांवर शिवसेनेचे संख्याबळ वाढले, वृक्ष प्राधिकरणावरही बहुमत  

चाणक्यनिती : BMC मध्ये सहा विशेष समित्यांवर शिवसेनेचे संख्याबळ वाढले, वृक्ष प्राधिकरणावरही बहुमत  

Subscribe

सहा विशेष समित्यांवर शिवसेनेचे संख्याबळ वाढले

मुंबईमध्ये मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅन्टालियाजवळ सापडलेल्या जिलेटीन युक्त कांड्यांच्या स्कार्पिओ, मनसुख हिरेनच्या हत्या आणि शिवसेनेचा सदस्य राहिलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या चौकशीवरून ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्नात विरोधी पक्ष भाजपने आघाडी घेतली आहे. मात्र दुसरीकडे मुंबई महापालिकेत शिवसेनेची नगरसेवकांची सदस्य संख्या वाढवताना विशेष समित्यांवर आणि वृक्ष प्राधिकरण समितीवर शिवसेनेचे संख्याबळ वाढवणारा महापालिकेतील नवा चाणक्य कोण ? याबाबत अधिकारी, चिटणीस खातेे, पत्रकार आणि विरोधीपक्षात चर्चा सुरू झाली आहे. अत्यंत गुप्तता राखत सोमवारी पार पाडलेल्या ऑनलाईन महासभेत नव्या सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईपर्यंत या कानाची खबर त्या कानाला न झाल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांत खुशीचे वातावरण आहे. कारण नवीन सात सदस्यांची वर्णी चाणक्य नितीमुळे आता समित्यांवर लागणार आहे.

महापालिकेच्या सहा विशेष समित्यांवर आणि वृक्ष प्राधिकरण सारख्या महत्वाच्या समितीवर मागील वेळेपेक्षा प्रत्येकी एक सदस्य वाढवल्याने आता कोणत्याही ठरावावेळी मतदान झाले तर शिवसेनेची कोंडी होणार नाही याची दक्षता पालिकेतील चाणक्य यांनी घेतल्याने आता पुढील वर्षभर चाणक्यनितीच कामाला येईल असे बोलले जात आहे. शिवसेनेचे संख्याबळ वाढताना राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ एकवर तर मनसेचे सर्व समित्यांवरील संख्याबळ शून्यावर आले आहे. तर वृक्ष प्राधिकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव सदस्य असलेला कप्तान मलिकच्या ठिकाणी शिवसेनेचा एक सदस्याची एन्ट्री झाल्याने आता वृक्ष प्राधिकरणात शिवसेना ७ सदस्य तर भाजपची संख्या ५ वर थांबली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेससह मनसेलाही जोरदार झटका लागला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडी सरकारमध्ये एकत्र आहेत. मात्र शिवसेनेने त्यांना महापालिकेत त्यांची जागा दाखवत विशेष समित्यांवरील त्यांची एन्ट्री बाद केली आहे. राष्ट्रवदाीच्या एका नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द होताच विशेषसमित्यांवरील त्यांच्या सदस्य संख्येवर गंडातर आणले आहे. यापूर्वी जिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांची विशेष समित्यांवर नियुक्ती होत होती तिथे आता केवळ एकाच सदस्याची वर्णी लागली जाणार आहे.

राष्ट्रवादी 8, सपा 6, एमआयएम २, मनसे १ 

मुंबई महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक निवडून आलेत. मात्र वॉर्ड क्रमांक 78च्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका नाजिया अब्दुल जब्बार सोफी यांचे महापालिका सदस्यत्व नुकतेच रद्द झाल्याने पक्षाची महापालिकेतील सदस्य संख्या 8 एवढी झाली. त्यामुळे त्याचा परिणाम सहा विशेष समित्यांवर झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक असल्याने विशेष समित्या असलेल्या स्थापत्य समिती शहर, उपनगरे , बाजार व उद्यान समिती, विधी समिती, सार्वजनिक आरोग्य समिती आणि महिला व बाल कल्याण समितीवर दोन ऐवजी एकाच नगरसेवकाची नियुक्ती होणार आहे. त्यामुळे या सर्व समित्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य कमी झाला आहे. तर वृक्ष प्राधिकरण समितीवरही एकमेव असलेल्या राष्ट्रवादीच्या कप्तान मलिक यांचाही पत्ता कापण्यात शिवसेनेचे पालिकेतील चाणक्य यशस्वी झाले आहेत. सध्या मुंबई महापालिकेत शिवसेना 97, भाजप 8४, काँग्रेस 29, राष्ट्रवादी 8, समाजवादी पक्ष 6, एमआयएम 2, मनसे १ असे 22७ नगरसेवक आहेत.

- Advertisement -

सत्ताधारी शिवसेनेने हा विशेष समित्यांवरील सदस्य संख्या कपातीचा प्रस्ताव आणून राष्ट्रवादी काँग्रेसस मनसेला झटका दिला. राष्ट्रवादीच्या कप्तान मलिक यांना पक्षाचे 8 नगरसेवक असल्याने प्राधिकरणावर सदस्य ठेवता येणार नाही हे लक्षात येताच त्यांचाही पत्ता कट करण्यात आला आहे. मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे हे स्थापत्य उपनगरे समिती, बाजार व उद्यान समितीवर सदस्य होते. मात्र केवळ एका नगरसेवकाच्या जोरावर कोणत्याही समतिीवर सदस्य राहता येणार नसल्याने त्यांचाही पत्ता कट करत शिवसेनेच्या नगरसेवकांची एण्ट्री केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेचे सदस्य कमी करून शिवसेनेच्या सदस्यांची वर्णी लावताना वृक्ष प्राधिकरण सारख्या महत्वाच्या समितीवर भाजपला 5 वर ठेवत शिवसेनेचे संख्याबळ ७ वर नेल्याने मातोश्रीही भाजपला चेकमेट दिल्याने खुशीत आहे. मात्र आतापर्यंत विशेष समित्यांवर नेमणुका करताना प्रत्येक पक्षाचे संख्याबळ याला पालिकेतील एकूण नगरसेवकांचा भागाकार केला जात नव्हता. मात्र महापलिका चिटणीस खात्याने यामध्ये चाणक्यनितीच्या सूचनेप्रमाणे पॉईंट टू पॉईंट नोंद केल्यानेच शिवसेनेचे विशेष समित्यांवरील संख्याबळ एकने वाढले, अशी माहिती चिटणीस खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍याने आपलं महानगरशी बोलताना दिली.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -