Assembly Election 2021: २७ मार्चला होणाऱ्या मतदानापूर्वीच ८२ वर्षाच्या व्यक्तीचं Voting!

पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यांत आगामी विधानसभा निवडणुका होणार आहेत. ज्याची सुरूवात २७ मार्च पासून होणार असून त्या दिवशी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. मात्र झारग्राममध्ये असा काही प्रकार घडला की सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीला २७ मार्च पासून सुरूवात होणार असून या निवडणुकीचा पहिला टप्पा त्याच दिवशी असून मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मात्र झारग्रामध्ये ८२ वर्षांच्या वयोवृद्ध व्यक्तीने यापूर्वीच मतदान केल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीने फक्त मतदान केलं नाही तर निवडणूक आयोगाने त्यांचं मत देखील ग्राह्य धऱलं आहे. काय आहे नेमका प्रकार वाचा सविस्तर…

अशी आहे घटना

मिळालेल्या माहितीनुसार, झारग्राममध्ये ८२ वर्षीय बसंती या महिलेने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपलं पहिलं मतदान केलं आहे. बसंती या महिलेव्यतिरिक्त त्याच मतदारसंघातील इतर ६ लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या सर्व व्यक्तींचे वय ८० वर्षांहून अधिक होते. निवडणूक आयोगाने यंदा वयवर्ष ८० आणि त्यापेक्षा अधिक असणाऱ्या किंवा गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या लोकांना घरीच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयांतर्गतच ७ वयोवृद्ध व्यक्तींनी मतदान केल्याची माहिती मिळतेय.

असं झालं मतदान…

असे सांगितले जात आहे की, ८२ वर्षीय बसंती या महिलेने जेव्हा मतदान केलं तेव्हा त्या घरातील खोलीत त्यांच्या परिवारातील कोणत्याही सदस्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. बसंती या महिलेने आपले मतदान बॅलेट पेपरद्वारे केले आणि तो लिफाफा सीलबंद ठेवण्यात आला. यावेळी याप्रसंगाचा व्हिडिओ देखील शूट करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. बसंती यांचं वय जास्त असल्याने त्यांना चालणं शक्य नसल्याने त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेणं अशक्य होते. ज्यावेळी बसंती यांच्या परिवाराला निवडणुक आयोगाच्या या सुविधेविषयी माहिती मिळाली तेव्हा त्यांना आपले मतदान करता आले, असे बसंती यांच्या परिवाराने सांगितले.

५ हजार वयोवृद्ध बजावणार मतदानाचा हक्क

झारग्राम जिल्ह्यातील चार विधानसभेच्या जागांवर २७ मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या ८६ टीम पुढील एका आठवड्यात अशाच वयोवृद्ध व्यक्तीच्या घरापर्यंत जाऊन त्याचं मतदान करून घेणार असल्याची माहिती मिळतेय. या जिल्ह्यात साधारण ५ हजार ७१५ असे मतदार आहेत त्यांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला आहे.